Posts

Showing posts from August, 2024

मखमलाबाद विद्यालयातील विद्यार्थिनी कु.आराध्या दराडेचे जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत सुयश

Image
फोटो - मखमलाबाद विद्यालयातील कु.आराध्या दराडेचे अभिनंदन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,जेष्ठ मार्गदर्शक शिक्षिका प्रमिला शिंदे मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील इ.५ वी अ ची विद्यार्थिनी कु.आराध्या सतिष दराडे हिने कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था व मुक्तांगण आयोजित गुरु शिष्य स्मृतिमाह जिल्हास्तरीय उस्फुर्त भाषण स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले.स्मृतिचिन्ह,६०१/- रु.रोख व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरुप होते.के.के.वाघ येथे मान्यवरांच्या शुभहस्ते तसेच विद्यालयात प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते तिला बक्षिस प्रदान करण्यात आले.या यशस्वी विद्यार्थिनीस जेष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे,वर्गशिक्षिका रोहीणी सोनवणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.कु.आराध्या दराडेचे मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे,मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,माजी सेवक संचालक डाॅ.अशोकराव पिंगळे,शिक्षणाधिकारी डाॅ.भास्करराव ढोके,अभिनव स्कुल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले,उच्च माध्यमिक स्कुल कमिटी अध्यक...