Posts

Showing posts from April, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

Image
नांदेड दि. २८ :-  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे आताचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान करुन त्यांना विशेष कामगिरीबाबत गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्हाधिकारी वर्धा या पदावर कार्यरत असताना, महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम, 2025 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी ‘सेवा दूत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभतेने सेवा पुरविण्यासाठी विशेष कामगिरी केली. या विशेष कामगिरीबाबत केलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श प्रस्थापित झाला आहे. या कामगिरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.