गुढीपाडवा मराठी नववर्षानिमित्त स्वागत यात्रा
इंदिरानगर :- जय श्री रामाचा जय जय कार करत शंख नादावर वय वर्ष पाच ते 85 पर्यंतच्या नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत महिला पुरुष याचे सह राम,लक्ष्मण,सीता, हनुमान आदी देवदेवतांची वेशभूषा केलेले बालगोपाळ लक्षवेधी ठरले तर नऊवारी साडी परिधान केलेल्या हातात भगवा ध्वज घेऊन वय वर्षे 5 च्या बालगोपाळांनी चित्त थरारक गोल रिंगण करून स्केटिंगची प्रात्यक्षिके सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेत ठीक ठिकाणी यात्रेचे स्वागत केल्याने नव वर्षाचा उत्साह सर्वत्र संचारला होता.नासर्डी ते पाथर्डी परिसरात मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात काढण्यात आल्या होत्या इंदिरानगर परिसरात हिंदू नववर्षाच्या ११ स्वागत यात्राचा समारोप एस आर चौकात एकमेकांना नववर्षांच्या शुभेच्छा देऊन करण्यात आला. वर्ष प्रतिपदा गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे इंदिरानगर मध्ये हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रा जल्लोषात काढण्यात आल्या.११ ठिकाणाहून निघालेल्या स्वागतयात्रेत अबाल वृद्...