मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव
नाशिक : गंगापूर रोडवरील निवासस्थानी वाढदिवसानिमित्त ॲड. नितीन ठाकरे यांचे औक्षण करताना सौ. वंदनाताई ठाकरे (पत्नी), सौ. अपर्णाताई ठाकरे, सौ. राधिकाताई ठाकरे (भावजय), डॉ. श्वेता भामरे (भाची), डॉ. सुखदा ठाकरे (कन्या), ॲड. सानिका ठाकरे (पुतणी) नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेचे सरचिटणीस आणि नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांचा अभीष्टचिंतन सोहळा साध्या पद्धतीने व मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवारी (दि.२७) सकाळी निवासस्थानी कुटुंबियांनी ६२ वा वाढदिवस असल्याने औक्षणाच्या ताटाची आकर्षक सजावट व त्यामध्ये वटवृक्षाची प्रतिकृती आणि ६२ दिवे प्रज्वलित करून ॲड. नितीन ठाकरे यांचे औक्षण केले. शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हितचिंतक, मित्र परिवार, नातेवाईक आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गंगापूर रोडवरील ‘दीपज्योती’ बंगल्यावर बुधवारी दिवसभर गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे पदाधिकारी, संचालक तसेच, शिक्षणाधिकारी, विविध शाखांमधील प्राचार्य, प...