मविप्र प्रज्ञा केंद्राचा प्रवास हा सरस्वती कडून लक्ष्मीकडे व्हावा - डॉ रघुनाथ माशेलकर
नाशिक :- मविप्रच्या ' प्रज्ञा ' बौद्धिक संपदा केंद्राचे डॉ माशेलकरांच्या हस्ते लोकार्पण नाशिक हि ज्ञानगंगेची नगरी असून मविप्र ने उभारलेल्या प्रज्ञा केंद्राचा प्रवास हा बुद्धी आणि संपदेच्या एकत्रिकरणातून सरस्वती कडून लक्ष्मीकडे व्हावा असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी केले ते दि. २८ फेब्रुवारी रोजी मविप्रच्या ' प्रज्ञा ' बौद्धिक संपदा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या आय एम आर टी महाविद्यालय येथे बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल,सुनील खांडबहाले,संस्थेचे संचालक विजय पगार,अंबादास बनकर,अमित बोरसे, शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके,डॉ डी डी लोखंडे,डॉ नितीन जाधव उपस्थित होते. या अगोदर मविप्र संस्थेच्या फार्म...