अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये ५०० यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण

नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाने ५०० यशस्वी इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा (IR Procedures) महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ.अमोल भालेकर, यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला जाते.या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक शाखा असून,मोठी शस्त्रक्रिया न करता सूक्ष्म उपकरणांच्या सहाय्याने आणि इमेजिंग मार्गदर्शनाखाली (CT, Ultrasound, Angiography) उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी धोका आणि जलद पुनर्वसन याचा मोठा फायदा होतो.या ५०० प्रक्रियांमध्ये अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजवरील उपचार,ट्यूमर एम्बोलायझेशन, व्हेरिकोस वेन्स उपचार,बायोप्सी,ड्रेनेज प्रक्रिया, डायलिसिस कॅथेटर बसविणे,तसेच विविध अवयवांशी संबंधित गुंतागुंतीच्या मिनिमली इन्वेसिव्ह प्रक्रियांचा समावेश आहे.अत्याधुनिक उपकरणे,अचूक इमेजिंग तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञ टीम यांच्या समन्वयातून या प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पाडण्यात आल्या.या कार्यक्रमात बोलताना डॉ.अमोल भालेकर म्हणाले,“५०० इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा टप्पा हा माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अत्यंत समाधानाचा क्षण आहे.इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमुळे अनेक गंभीर आजारांवर मोठी शस्त्रक्रिया न करता प्रभावी उपचार करता येतात. रुग्णांना कमी त्रास देऊन सर्वोत्तम परिणाम मिळवणे हेच आमचे ध्येय आहे.”याप्रसंगी बोलताना हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,“अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने रुग्णांना जागतिक दर्जाची सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो.डॉ.अमोल भालेकर यांनी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी क्षेत्रात केलेली ही कामगिरी नाशिक व उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.”या यशामुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने मिनिमली इन्वेसिव्ह उपचार पद्धतींच्या क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण केली असून,भविष्यातही अत्याधुनिक, सुरक्षित आणि रुग्ण-केंद्रित सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी