राज्यव्यापी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा नाशिकमध्ये संपन्न

नामदेव शिंपी समाजाचा पुढाकार

नाशिक :-  नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ,नाशिक यांच्या वतीने आयोजित २१ वा नामदेव शिंपी समाज उत्सव शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
महामार्ग बस स्थानकाजवळील तुपसाखरे लॉन्स येथील कै. श्री. संजीव विष्णुपंत तुपसाखरे सभागृहात हा सोहळा पार पडला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अतुल सुधाकर मानकर (अध्यक्ष, नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ) यांनी उपस्थितांचे स्वागत करत समाजातील ऐक्य आणि संघटनाबळ यावर भर दिला.महिला अध्यक्षा वृषाली संजीव तुपसाखरे,यांनी आपल्या मनोगतातून समाजातील महिलांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्यव्यापी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा होय. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पालक व युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.या मेळाव्याच्या माध्यमातून सुयोग्य स्थळांची माहिती देवाण-घेवाण होऊन समाजातील वैवाहिक जुळवाजुळव सुलभ व्हावी,हा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला.याशिवाय समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार,सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजप्रबोधनपर मार्गदर्शनपर भाषणे यामुळे उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव मिळाला.समाजातील परंपरा,संस्कृती आणि एकोप्याची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांनी सर्व समाजबांधवांचे आभार मानले.यावेळी आमदार देवयानी फरांदे,नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचे अरुण नेवासकर, उपाध्यक्ष राजेंद्र करमासे,अशोक कालेकर, सचिव शामसुंदर रहाणे, कोषाध्यक्ष रमेश बकरे , सहकाशाध्यक्ष जयंत भांबारे, जनसंपर्क प्रवीण पवार, संतोष लचके,महिला अध्यक्ष श्रीमती वृषाली तूप साखरे ,महिला उपाध्यक्ष अर्चना मानकर,यांसह आधी मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी