नागपूर येथे संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंम्मेलनाचे दि.२२ फेब्रुवारी रोजी आयोजन


नाशिक :- समस्त शिंपी,दर्जी समाजाचे रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रेशिमबाग या ऐतिहासिक मैदानावर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन होणार असून संपूर्ण भारतातील समस्त शिंपी समाजातील पोटजाती यानिमित्ताने एकत्र येत आहेत.या महासम्मेलनात राजस्थान येथील पद्मश्री रामकिशोरजी छीपा डेरावाला,गुजरातचे पद्मश्री कनुभाई टेलर,प्रवीणभाई दर्जी,आणि संत मंडळी,राजकीय प्रतिभावान समाजबंधू,भजनी मंडळे यांचा सहभाग होणार आहे.या कार्यक्रमाला देशपातळी वरील मान्यवर उपस्थित राहणार असून यावेळी संत नामदेव महाराज विश्वरत्न पुरस्काराने सड़क परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय,भारत सरकार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान,केंद्रीय कृषि मंत्री प्रल्हाद जोशी,उपभोक्ता मामले,खाद्य आणि सार्वजनिक वितरण तथा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री,भारत सरकार
खा.प्रणीती शिंदे, सरहद्द संस्था पुणे येथील अध्यक्ष संजय नहार,खा.अनिल बोंडे,संजय खोडके,आ.सुलभा खोडके,आ.रविकुमार राणा, खा नवनीत राणा,चरित्र अभिनेते गोविंद नामदेव यांच्यासह संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचे वंशज संत मंडळी,ह.भ.प.जिंतेंद्रनाथ महाराज,स्वामी गोविन्दगिरी महाराज,सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज,महाराष्ट्रातील नुकतीच निवडून आलेले समाजाचे नगरसेवक तसेच समाजाचे विविध पदाधिकारी,पोट शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी समस्त शिंपी समाजाच्या प्रमुख मागण्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव राष्ट्रीय महापुरूष व संतांच्या यादीमध्ये समाविष्ठ करावे.पंढरपुर येथे होत असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्मारकाला भरीव निधी मंजुर करून काम प्रत्यक्षात सुरू करणे.जातिवंत शिंपी विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती जाहीर करणे व जिल्हा किंवा शहर पातळीवर विद्यार्थी व विद्यार्थीनीं करिता संत शिरोमणी नामदेव महाराज वसतीगृहाची स्थापना करणे.MIDC क्लस्टर झोनमध्ये शिंपी उद्योजकां करिता प्लॉट राखीव ठेवून,त्या करिता सुविधा उपलब्ध करून देणे नगर पालिका व महानगर पालिका क्षेत्रात सरकारी बिल्डींग मध्ये जातीवंत शिंपीं करीता गाळे राखीव ठेवणे.जातीवंत शिंपी महिला व युवतीं करीता सर्व क्षेत्रात विशेष सुविधा व सशक्त करण्याचे प्रयत्न करणे.राजकीय क्षेत्रा मध्ये जातीवंत शिंपी समाज बांधवांना संख्येप्रमाणे सामावुन घेणे.आदी प्रमुख मागण्या आहेत.या विश्व संमेलनाला उपस्थित रहावे असे संमेलनाचे अध्यक्ष भास्कर के.टोम्पे,मुख्य संयोजक ईश्वर धिरडे,अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था अध्यक्ष वनेश खैरनार, वृषाली तूपसाखरे,सुधर्मा खोडे,संजीव राऊत,दिपक नानोटकर आदिंसह महाराष्ट्र प्रदेश समस्त शिंपी समाज संस्थापक,अध्यक्ष प्रदीप जगताप,यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी