येवल्यात सर्वपक्षीय नेत्यांकडून स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने 'दादा' व्यक्तिमत्व गमावले; येवला येथील शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांच्या शोकभावना व्यक्त
मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोबत आणला अस्थिकलश
स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने एक जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड - मंत्री छगन भुजबळ
स्व.अजितदादा यांचे महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेले विचार पुढे नेण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी - मंत्री छगन भुजबळ
येवला,दि.२फेब्रुवारी:-स्व.अजितदादा पवार यांचे निधनाने माझ्या आयुष्यात ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. आजही त्याचं निधन मन स्वीकारला तयार नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक स्पष्टवक्ता, शिस्तप्रिय आणि जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,अशा शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माऊली लॉन्स येवला येथे शोकसभा पार पडली.यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ,माजी आमदार मारोतीराव पवार,माजी आमदार कल्याणराव पाटील,ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,पंढरीनाथ थोरे,संभाजी पवार, विश्वासराव आहेर,अरुण थोरात,मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,लासलगाव बाजार समितीचे सभापती डी.के.जगताप, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी,येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम,साहेबराव मढवई,भाऊसाहेब भवर,माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, किसनकाका धनगे, संजय बनकर, मोहन शेलार, अमजद शेख, राजेश भांडगे, रतन बोरनारे, प्रमोद सस्कर,शफीक शेख,दीपक लोणारी,मकरंद सोनवणे,सचिन कळमकर, प्रकाश वाघ,प्रवीण बनकर,सनी पटणी,दत्तूपंत डुकरे, सुभाष पाटोळे,एल.जी.कदम,दत्ता रायते, प्रवीण गायकवाड,सुरेखा नागरे,डॉ.प्रवीण बुल्हे, राजश्री पहिलवान,समीर समदडीया,अल्केश कासलीवाल,बाळासाहेब गुंड,मच्छिंद्र थोरात, निसार लिंबूवाले,गोटू मांजरे,डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय, अरुण काळे,मंगेश गवळी,बाळासाहेब पिंपरकर, साहेबराव आहेर,गणपत कांदळकर,गुड्डू जावळे, नितीन गायकवाड,देविदास निकम,भगवान ठोंबरे, विनोद ठोंबरे,संजय पगार,जावेद लखपती,माधव जगताप,सुनील पैठणकर,भाऊसाहेब धनवटे,संतोष खैरनार,पी.के.काळे,अशोक नागरे,बाळासाहेब पुंड,तानाजी आंधळे,सचिन सोनवणे,सुमित थोरात,यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व येवलेकर बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खरतर हा असा प्रसंग आपल्यावर येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.२७ जानेवारी रोजी कॅबिनेट मिटिंगच्या निमित्ताने दिवसभर सोबत होतो. २८ तारखेला अचानक त्याचं विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या या बातमीने मन सुन्न झाले होते.कुठलाही शब्द सुचत नाही. या घटनेने सोन्यासारखी माणसं आपल्यातून आज निघून गेली आहे. ही अतिशय धक्का लाऊन जाणारी घटना माझ्या आयुष्यात घडली असून अद्यापही माझं मन हे स्वीकारायला तयार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.ते पुढे म्हणाले की,गेली अनेक वर्ष अजितदादा यांच्या सोबत काम करत आलो.माझ्या ज्येष्ठत्वाचा त्यांनी नेहमीच आदर केला. कुठल्याही विषयावर त्यांना माहिती दिली की त्यावर त्यांनी लगेचच काम केले.अतिशय शिस्तप्रिय जिंदादिल स्पष्टवक्ता नेते होते. अजितदादांची ओळख एक'कडक शिस्तीचे प्रशासक' अशी होती. त्यांचा दिवस पहाटे ५ वाजता सुरू व्हायचा आणि मंत्रालयात ते सर्वांत आधी पोहोचायचे.सत्तेत असो वा नसो,जनतेचे प्रश्न ऐकणे,त्यावर ठाम भूमिका घेणे आणि अंमलबजावणीसाठी झटणे,हा त्यांचा स्वभाव होता. शेतकरी,कष्टकरी, युवक,महिला,उद्योग, सहकार सर्व घटकांना त्यांनी आपल्या कार्यकाळात न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.'कडक शिस्तीचे प्रशासक'अशी ओळख असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळताना त्यांनी आर्थिक नियोजनात कमालीची शिस्त पाळली.फाईलींचा निपटारा करण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नसे."जे बोलायचे ते करून दाखवायचे" या वृत्तीमुळे अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक होता आणि सर्वसामान्यांचा त्यांच्यावर विश्वास होता.ते म्हणाले की,दादांनी नाशिक जिल्ह्यावर'अर्थकृपा' करत विकासकामांचा डोंगर उभा केला.९ऑगस्ट २०२४ रोजी येवल्यातील विणकर मेळाव्यात त्यांनी २५ हजार कोटींच्या वस्त्रोद्योग धोरणाची घोषणा करून विणकरांच्या जीवनात प्रकाशाची किरणे आणली.अजितदादा हे केवळ शहरी विकासाचे नेते नव्हते,तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.किकवी धरण, ओतूर,पुनंद आणि मांजरपाडा या प्रकल्पांसाठी त्यांनी दिलेले अर्थबळ ऐतिहासिक आहे.सिन्नरच्या पूरचाऱ्यांसाठी दिलेला १०० कोटींचा निधी त्या भागातील दुष्काळ हटवण्यासाठी मैलाचा दगड ठरला.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रद्द होण्याच्या उंबरठ्यावर असताना,नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी ६७२ कोटींचा निधी मंजूर करून बँकेला आणि ५६ हजार शेतकऱ्यांच्या जमिनींना वाचवले.बँक बुडवणाऱ्या संचालकांवर कारवाई व्हावी, पण शेतकऱ्यांचा बळी जाऊ नये,ही त्यांची भूमिका शेतकरी हिताची होती.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे मार्गासाठी त्यांनी ५०० कोटींची तरतूद करून भूसंपादनाला वेग दिला. त्यांच्या निधनाने आज महाराष्ट्र पोरका झाला आहे.पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.अजितदादा यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना.व्यक्त करतो दादा,हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार म्हणाले की, अजितदादा यांचे निधन झाल्याने अतीव असे दुःख झाले आहे.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रखर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असून महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारी हानी झाली असल्याच्या शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील म्हणाले की, शाहू, फुले,आंबेडकरांचा सामाजिक वसा अजित दादा पवार यांनी पुढे नेला.त्यांच्या जाण्याने बहुजन समाजाची कधीही न भरून निघणारी हानी झाली असल्याच्या शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर म्हणाले की, स्व.अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे.त्यांनी शाहू, फुले,आंबेडकर यांच्या विचारांवर वाटचाल करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले असल्याच्या शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी,माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, हुसेन शेख,शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे,भाजपचे धनंजय कुलकर्णी,डि.के.जगताप,प्रमोद सस्कर,शिवसेना शिंदे गटाचे किशोर सोनवणे,समता प्रतिष्ठानचे प्रा.अर्जुन कोकाटे,उबाठा सेनेचे शिवा सुराशे,लक्ष्मणराव गवळी,भाऊसाहेब भवर, प्रवीण गायकवाड,योगेश जहागिरदार, काँग्रेसचे ॲड.समीर देशमुख,गुणवंत होळकर, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, अनिल सोनवणे, शिवाजी सुपनर, संध्याताई पगारे, उमेश अट्टल, दत्तू पाटील डुकरे,कॉम्रेड भगवान चित्ते,डॉ.सुजित गुंजाळ,पारुल गुजराथी यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.यावेळी मंत्री छगन भुजबळ,व माजी खासदार समीर भुजबळ,यांनी सोबत आणलेला अस्थिकलश अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला.यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण करत अस्थिकलशाचे दर्शन घेत आदरांजली अर्पण केली.या शोकसभेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाले,यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा