कळवण मर्चंट बँकेच्या वतीने सभासदांना ट्रॅव्हल्स बॅग वाटप शुभारंभ
कळवण :- कळवण तालुक्याची अर्थवाहिनी असलेली,प्रगतीची संजीवनी हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असणारी दि.कळवण मर्चंट बँके मार्फत सभासदांसाठी ट्रॅव्हल्स बॅग वाटपाचा शुभारंभ गुरुमाऊली आणासाहेब मोरे,यांच्या शुभहस्ते कळवण लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक लायन क्लब इंटरनॅशनल चे अध्यक्ष राजेश कोठावदे होते.प्रमुख अतिथी म्हणून मुकुंद कुलकर्णी,नाशिक, नामको बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक,नामको बँकेचे संचालक अशोक सोनजे,गिरीश महाजन नाशिक महापालिका नगरसेवक भूषण राणे, महेश पितृभक्त,शाम महाजन,रमेश मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.कमको बँकेचे संचालक व नेते गजानन सोनजे,नेते संजय मालपुरे चेअरमन भारती कोठावदे,व्हा चेअरमन लक्ष्मण खैरनार, जनसंपर्क संचालक रंगनाथ देवघरे,प्रवीण संचेती योगेश महाजन,दिपक वेढणे,नितीन वालखेडे,सागर शिरोरे,शालिनी महाजन, सुभाष शिरोडे,धनंजय अमृतकर,विनोद मालपुरे,डॉ धर्मराज मुर्तडक,सतीश कोठावदे पोपट बहिरम, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजन मालपुरे,तज्ञ संचालक गलिब मिर्झा,भूषण कोटकर,शाखा व्यवस्थापक कैलास जाधव,व सर्व कर्मचारी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला.सूत्रसंचालन दिपक वेढणे, कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचालक योगेश महाजन,यांनी तसेच आभार प्रदर्शन भारती कोठावदे,यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा