त्र्यंबकेश्वरला जाताय,शिवरात्री यात्रे निमित्त मंदिर ट्रस्टची महत्वाची माहिती


त्रंबकेश्वर :- महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे खालील प्रमाणे निवेदन प्रसिध्द करण्यात येत आहे.श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर जय्यत तयारी.महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी सकाळी ०४:०० वाजेपासून सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी रात्री ०९:०० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहील.त्याकरिता पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल.भाविकांची श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता,कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता सर्व प्रकारचे व्हि.आय.पी. प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे दि. १५/०२/२०२६ रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.दिनांक १४/०२/२०२६ ते १६/०२/२०२६ रोजी सकाळी मंदिर उघडल्यापासून सकाळी १०:३० वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक गावकरी यांनी पश्चिम द्वाराने ओळखपत्र (आधारकार्ड) दाखवून पश्चिम दरवाजाने प्रवेश करून मंदिराच्या उत्तर द्वार (जाळीचा दारवाजा) येथून दर्शनासाठी प्रवेश करून दर्शन झाल्यावर मंदिराच्या दक्षिण गेट (गायत्री गेट) येथून बाहेर जावे.हा प्रवेश फक्त गावकरी यांनाच देण्यात येईल,त्यांच्या सोबत आलेले नातेवाईक अथवा पाहुणे यांना प्रवेश दिला जाणार नाही.ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक स्ट्रक्चरल विद्युत रोशनाई करुन सजविण्यात येणार आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह,सभामंडप,प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार, इ. ठिकाणी फूलांची सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवा निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे ३ दिवसांकरीता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून,त्यामध्ये१) दिनांक १४/०२/२०२६ रोजी सायं. ०७:०० वाजेपासून सायं. ०९:३० या वेळेत ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा “गीत रामायण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २) परंपरेनुसार दि. १५/०२/२०२६ रोजी दुपारी ०३:०० वाजता श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातुन निघून पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये दाखल होईल.पालखी दरम्यान शिव-तांडव ग्रुप तर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण मंदिरासमोर,मुख्य दोन चौकांमध्ये तसेच मंदिर पटांगणात आयोजित करण्यात येणार आहे.३) श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे दि. १५/०२/२०२६ रोजी परंपरेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी ०५.०० वाजता करण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त रात्री ११:०० वाजेपासून प्रभू श्री त्र्यंबकराजांची महापूजा तसेच अंतर्गत पालखी सोहळा असणार आहे. ४) दिनांक १६/०२/२०२६ रोजी सायंकाळी ०६:०० ते ०७:०० यावेळेत प्रिया दिक्षित व ग्रुप, ०७:०० ते ०७:१५ यावेळेत कलानंद कथ्थक नृत्य संस्था, ०७:१५ ते ०७:२० यावेळेत कलाध्यास ग्रुप, ०७:२० ते ०७:३० यावेळेत कु.ओवी पुरुषोत्तम कडलग व ०७:३० ते ०८:३० यावेळेत ओम नटराज अकॅडेमी यांचे सांस्कृतिक कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर सर्व कार्यक्रम हे श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटांगणात होणार आहे. या सर्व गोष्टींचा भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी आनंद घ्यावा व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे,ही विनंती.ग्रामस्थांसाठी दर्शनासाठी चे नियोजन हे फलकावरही प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी