शिवजन्सोमोत्सव समितीच्या वतीने स्टेज भुमीपुजन संपन्न

इंदिरानगर :- सर्वधर्मसमभाव सर्वपक्षीय एकजुटीने अशोक मार्ग,श्री.श्री.रविशंकर मार्ग नाशिक,येथे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने स्टेजचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास प्रभाग क्रं.२३ व ३० मधील नगरसेवका रुपाली निकुळे,सुप्रिया खोडे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्णी,मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सुनील खोडे,योगेश म्हस्के,प्रवीण जाधव, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक,माता-भगिनी तसेच मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.या प्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अजिंक्य वहाडणे,उपाध्यक्ष प्रवेन गवारे, कार्याध्यक्ष महेश पाटील,खजिनदार साहिल पाटील,सरचिटणीस संदीप बोराडे,ऋषिकेश चव्हाण,यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे परिश्रम घेतले.यावेळी उपस्थित मान्यवर व शिवभक्तांनी आगामी शिवजन्मोत्सव सोहळा अधिक उत्साहात,शिस्तबद्ध पद्धतीने व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा संकल्प केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी