व्होल्वो कार इंडिया आणि चार्जझोन यांच्याकडून इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर अल्ट्रा-फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन लाँच
ईगतपुरी :- ईगतपुरी मुंबई-नाशिक महामार्गावरील फूड हिल्स येथे स्थित ३६० केडब्ल्यू स्टार चार्ज पॉवर युनिटसह दोन डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्पेन्सर्स आहेत नाशिक,१९फेब्रुवारी स्वीडिश लक्झरी कार ब्रँड व्होल्वो कार इंडिया आणि भारतातील सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग नेटवर्क चार्जझोन यांनी आज मुंबई-नाशिक महामार्गावर अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले.या चार्जिंग स्टेशनमध्ये ३६० केडब्ल्यू स्टार चार्ज पॉवर युनिटसह दोन डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्पेन्सर्स आहेत.हे चार्जिंग स्टेशन इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावरील फूड हिल्स येथे स्थित आहे.हे उद्घाटन देशभरात प्रीमियम सुपरचार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी त्यांच्या सहयोगामधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे.हे इंटेलिजण्ट कॉन्फिग्युरेशन व्होल्वो ग्राहक आणि इतर ईव्ही वापरकर्त्यांना सानुकूल ऊर्जा वितरण,कमी प्रतिक्षा कालावधी व वास्तविक विश्वामध्ये जलद चार्जिंग अनुभव देते. महाराष्ट्रातील सर्वात वर्दळीच्या इंटरसिटी मार्गावर धोरणात्मकरित्या स्थित या चार्जिंग स्टेशनमध्ये व्होल्वो ईव्हींसाठी समर्पित बे आहेत. तसेच अॅपमध्ये नेव्हिगेशन व पेमेंट्स सुविधा मिळतात.अशा सोयीसुविधा व विश्वसनीयतेसह ग्राहकांना उत्साहवर्धक अनुभव मिळतो.
आज चार्जिंग स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारोहामध्ये मत व्यक्त करत व्होल्वो कार इंडियाचे एमडी ज्योती मल्होत्रा म्हणाले,''वारसायुक्त ब्रँड म्हणून व्होल्वो कार्स शाश्वत गतीशीलतेप्रती परिवर्तनाला गती देण्याप्रती कटिबद्ध आहे आणि चार्जझोन सोबत या सहयोगामधून ती कटिबद्धता दिसून येते. सहयोगाने,आम्ही खात्री घेत आहोत की ग्राहक व्होल्वो ईव्हींची लक्झरी व कार्यक्षमतेचा आनंद घेतील,तसेच त्यांना विश्वासार्ह व त्रासमुक्त चार्जिंग पायाभूत सुविधा देखील उपलब्ध होतील. मुंबई-नाशिक महामार्गावर नवीन ३६० केडब्ल्यू स्टेशन संपूर्ण भारतात जागतिक दर्जाचा चार्जिंग अनुभव देण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे.''
समारोहाप्रसंगी उपस्थिती असलेले चार्जझोन चे संस्थापक व सीईओ कार्तिकेय हरियाणी आपले मत व्यक्त करत म्हणाले,''व्होल्वो कार इंडियासोबत सहयोगाने लाँच करण्यात आलेले आमचे पहिले को-बँडेड ३६० केडब्ल्यू अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशन देशासाठी प्रीमियम, भविष्याकरिता सुसज्ज चार्जिंग नेटवर्क उभारण्यामधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मुंबई-नाशिक हबमधून हाय-स्पीड, तंत्रज्ञान सक्षम पायाभूत सुविधेवरील आमचा फोकस दिसून येतो,ज्याला डायनॅमिक पॉवर लोडिंग सारख्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांचे पाठबळ आहे,जी ग्राहक अनुभव अधिक उत्साहपूर्ण करतात.ईव्हीचा अवलंब वाढत असताना आम्ही लांब अंतरापर्यंतचा प्रवास जलद, उत्साहवर्धक व विनासायास होण्याची खात्री घेण्याला प्राधान्य देत आहोत.आम्ही अधिक शुद्ध व अधिक शाश्वत गतीशीलता क्षेत्राप्रती भारताच्या परिवर्तनाला पाठिंबा देण्यास उत्सुक आहोत.''चार्जझोन आणि व्होल्वो कार इंडिया यांनी प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर हाय-स्पीड ईव्ही चार्जिंग अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी २०२५ मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती,ज्यानंतर हे चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यात आले आहे. तसेच, २०२६ मध्ये आणखी काही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आहे.सहयोगामधून लांब अंतरापर्यंत ईव्ही प्रवास सुधारण्याप्रती, चार्जिंग उपलब्धता वाढवण्याप्रती आणि शाश्वत गतीशीलतेसाठीच्या भारताच्या परिवर्तनाला गती देण्याप्रती,तसेच देशभरात लक्झरी व कार्यक्षम ईव्हींचा अवलंब करण्याला प्रेरित करण्याप्रती दोन्ही कंपन्यांची समान कटिबद्धता दिसून येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा