भंडाऱ्यात न्हाली गोदातीर ४६ वर्षांनंतर मऱ्हळच्या खंडोबाची गोदावरीशी भेट

करंजी खुर्द येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न 

नाशिक :- श्रीमंत भुषण सिंह राजे होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,यांचे वंशज यांची सोहळ्यास उपस्थिती'यळकोट यळकोट जय मल्हार मार्तंड भैरवाचा' आणि 'सदानंदाचा येळकोट' अशा जयघोषात,प्रतिजेजुरी मऱ्हळ येथील खंडोबा महाराज पालखी तब्बल ४६ वर्षांनंतर गोदावरी नदीच्या भेटीसाठी करंजी खुर्द येथे दाखल झाली. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यासाठी करंजी खुर्द येथील ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळांनी स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन,पिण्याचे पाणी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा केली या महाशिवरात्री यात्रोत्सवात भक्ती,परंपरा आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम पहावयास मिळाला.पालखी करंजी खुर्द सिन्नर तालुका व निफाड तालुका सरहद्दीवरुन डि.जे लावुन भंडाऱ्याची उधळण करत फट्याक्याची आतिष बाजी करत पालखीचे गोदावरी नदीच्या काठावर आगमन झाले यावेळी देवतांना गोदावरी नदी पात्रात स्नानासाठी विशेष व्यवस्था ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आली होती वाकद शिरवाड्याचे सरपंच डॉ.श्रीकांत आवारे सौ. मनीषा आवारे दाम्पत्याच्या हस्ते पालखीचे विधीवत पूजन आणि आरती करण्यात आली. ४६ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हा योग जुळून आल्याने ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करत पालखीचे जंगी स्वागत केले. तसेच रात्री करंजी खुर्द येथील ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्यासाठी उपस्थित भाविकांना व पंचक्रोशीतील हजारो भक्तांना महाप्रसाद फराळाचे वाटप करण्यात आले. रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला.या उत्सवास पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिहराजे होळकर,यांची उपस्थिती लाभली.त्यांनी करंजी खुर्द येथील पुरातन महादेव मंदिरात विधीवत अभिषेक आणि पूजन केले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला करंजी खुर्द ते मऱ्हळ या ठिकाणाहून खंडोबाची पालखी येऊन महाशिवरात्रीला मोठ्या यात्रेच आयोजन होळकर काळापासून होते आणि यामुळेच होळकर यांच्या काळापासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर हि यात्रा भरवली जायची काही काळापासून यात्रेला खंड पडला होता परंतु आता परत एकदा ग्रामस्थानी एकत्र येऊन या यात्रेला शुभारंभ केलेला आहे या यात्रेची यशस्वीरित्या परत एकदा सुरुवात झाल्याने प्रमुख पाहुणे म्हणून भुषण सिंह राजे त्या ठिकाणी उपस्थित होते.प्रसंगी भाषणामध्ये होळकर परिवाराचा व करंजी चा ऋणानुबंध संबंध कसा आला याबाबत होळकर यांनी उपस्थितांना माहिती दिली.या प्रसंगी यात्रेसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला या वेळी मुकुंद राजे होळकर,मच्छिंद्र बिडगर,खंडेराव पाटील, रामदास काळे,समाधान बागल,लक्ष्मणबर्गे दीपक सूडके,आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी