त्र्यंबकेश्वरला मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन


नाशिक,त्र्यंबकेश्वर :- महाकुंभ २०२६ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सर्व आखाड्यांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ संपन्न झाले.महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी आखाडे,महंत,साधू-संत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या सुविधांसाठी दर्जेदार व टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.कुंभमेळ्याचे नियोजन करताना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत,तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये,असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.याप्रसंगी महंत साधू-संत,आखाडा परिषदेचे पदाधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासन यांच्या सहकार्याने नाशिक–त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६ निश्चितच भव्य,सुव्यवस्थित व जागतिक दर्जाचा होईल,असा विश्वास मंत्री महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.प्रसंगी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री.महंत रवींद्रपुरीजी (निरंजनी आखाडा),अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरीजी महाराज,कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती,विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार,यांच्यासह सर्व आखाड्यांचे महंत,साधू,संत व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी