सकल मराठा परिवाराकडून वृक्षलागवड करून शिवजन्मोत्सव साजरा


नाशिक :- पत्रकार सकल मराठा परिवाराच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून आगळीवेगळी शिवजयंती मनपा शाळा क्रमांक ४९,पंचक. या ठिकाणी साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे गडकोट आणि निसर्गाचे जतन केले,त्याच प्रेरणेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी,भविष्यातील पिढीने निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी,या उद्देशाने प्रत्येक रोप हे शिवप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून लावण्यात आले.वृक्षारोपण हीच खरी शिवसेवा समाजहित आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही शिवजयंती खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल.या उपक्रमासाठी आपलेत पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी त्यांनी वृक्षारोपण कसे करावे याविषयी तसेच झाडांच्या विविध प्रजाती विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.तसेच मोलाचे सहकार्य ऍड.सुनील आण्णा बोराडे,शालेय समिती अध्यक्ष,केंद्रप्रमुख गोपाल बैरागी सर,योगेश निसाळ,मुख्याध्यापिका विमल रायते,(ढिकले )तसेच रवी बच्छाव,सरला बोरसे,योगेश पवार,सोमनाथ सहाने,शिवाजी झाडे,रमेश थेटे,दिपाली मेघाने,माधुरी जगताप,वृषाली खैरनार प्राजक्ता/वर्षा ऐडाईत( पवार) शाळेच्या शिक्षक शिक्षिका सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.या उपक्रमात सकल मराठा परिवाराचे खंडूभाऊ आहेर,प्रकाश बोराडे,योगेश वरखडे, संजय गोरडे, संजय झारोळे,कैलास देशमुख,धनाजी आगळे,स्नेहल काळे,सिंधुताई पगार,उपस्थित होते.शाळा परिसरात बकुल,बेहडा,तामण, कुसुम,कांचन अशी विविध 80 फुल,फळझाडे लावण्यात आली.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांनी संयोजन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी