मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

नाशिक,दि.२ फेब्रुवारी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकच्या रामकुंडावर विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे अस्थिकलश आज नाशिक येथे आणले.आज नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ,माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर,आमदार सरोज आहिरे,माजी आमदार जयवंतराव जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,काँग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,आनंद सोनवणे,सीमंतिनी कोकाटे,समाधान जेजुरकर, शंकर मोकळ,आशा भंदूरे, सुरेखा निमसे,ज्ञानेश्वर गायकवाड,तानाजी गायधनी,नरेश पाटील यांच्यासह पक्षाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी