गिरणा आरोप प्रकरणी उबाठा सेनेचे खा संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली
गिरणा साखर कारखान्यातील शेअर होल्डर्स, शेतकरी बांधव तसेच सर्व मालेगावच्या जनतेची संजय राऊत यांनी मागितली माफी.!
मालेगाव :- दैनिक सामना मध्ये खा. संजय राऊत यांच्या माध्यमातून गिरणा साखर कारखान्याबाबत १७८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.या बातमीमुळे मालेगाव आणि पंचक्रोशीतील शेतकरी सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला.याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,हा आरोप पूर्णपणे निराधार व चुकीच्या माहितीतून करण्यात आला होता.एकेकाळी सहकारातून उभा राहिलेला गिरणा सहकारी साखर कारखाना विक्रीच्या प्रक्रियेत असताना,तो तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा या उद्देशाने सुमारे ११ हजार सभासद शेतकरी एकत्र आले होते.प्रति शेअर ११०० रुपये उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.सर्वपक्षीय लोकांनीही या प्रयत्नाला साथ दिली.काही कारणांमुळे अपेक्षित भागभांडवल पूर्णपणे उभे राहू शकले नाही; मात्र जेवढी १.७८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली,ती अधिकृत पद्धतीने आरटीजीएसद्वारे कारखाना खरेदी करणाऱ्या कंपनीकडे वर्ग करण्यात आली.हा सर्व व्यवहार नोंदीनुसार आणि कायदेशीर मार्गाने झालेला होता.यावेळी स्पष्ट केले की,या चुकीच्या आरोपांमुळे शेतकरी सभासदांचा अवमान झाला.त्यामुळे सभासद शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.संबंधितांकडे शब्द मागे घेण्याची मागणी करत नोटीसही देण्यात आली होती.प्रारंभी त्याची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे खटला दाखल करण्यात आला.नंतरच्या काळात संजय राऊत यांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता आरोप चुकीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.खोट्या माहितीच्या आधारे आरोप झाल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी मालेगावच्या शेतकरी सभासदांची दिलगिरी व्यक्त केली.त्यांच्या माफीची दखल घेत,तसेच त्यांच्या तब्येतीचा व इतर बाबींचा विचार करून संबंधित खटला मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री दादा भुसे यांनीही यावेळी स्पष्ट केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा