राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्वखर्चाने होणार संपूर्ण येवला शहराची नालेसफाई स्वच्छता
प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते ‘स्वच्छ येवला सुंदर येवला’ मोहिमेस सुरवात येवला,दि.३० जून :- येवला शहरात गेल्या वर्षी पावसळ्यात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ येवला सुंदर येवला’ निर्माण करण्यासाठी संपूर्ण येवला शहरात स्व खर्चातून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्याधिकारी रोहित पगार, पालिकेचे स्वच्छता निरिक्षक सागर झावरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, माजी नगसेवक प्रवीण बनकर, सचिन शिंदे, राजेश भांडगे, निसार शेख, सुनील काबरा, संजय परदेशी, मलिक शेख, राजाभाऊ लोणारी, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, निर्मला थोरात, सीमा गायकवाड, विमल शहा, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, दिपक खोकले, सुभाष गांगुर्डे, भूषण लाघवे, विकी बिवाल, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, सुमित थ...