नाशिक महानगरपालिका,सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग पाणी पुरवठा जाहिर निवेदन

नाशिक :- संपुर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक तसेच सिंहस्थ प्राधान्य विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची व अत्यावश्यक कामे तसेच स्मार्ट सिटी मार्फत काही अत्यावशक कामे करण्यासाठी शनिवार दि. ०४ व रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसांचा शट डाऊन घेण्याचे नियोजित असुन या दोन दिवस संपूर्ण नाशिक शहरात खालील नमूद परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तरी शहरातील सर्व नागरीकांनी मनपास सहकार्य करावे.संपुर्ण नाशिक शहरात दोन दिवसांचा शट डाऊन कालावधीमध्ये विभागनिहाय खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार असुन मक्तेदार व कामाचा कालावधी देण्यात आलेला आहे.
नाशिक पुर्व विभाग
१) नाशिक पुर्व प्र.क्र. ३० मधील कलानगर जलकुंभ भरणारी ५०० मी.मी. व्यासाची गुरुत्व वाहीनी मुख्य ७०० मी.मी. व्यासाच्या गुरुत्व वाहीनीला जोडणे मक्तेदार मेघ कंस्ट्रुवेल कालावधी अंदाजे २४ तास
२) गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र लक्ष्मी सिव्हील इंजिनिअर
नाशिक पश्चिम विभाग
१) त्र्यंबक रोड एबीबी सर्कल येथे मोठया प्रमाणत असलेले ३०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन लिकेजचे काम बंद करणे     
२) पी ॲन्ड टी कॉलनी येथे २०० मी.मी. व्यासाचा एअर व्हॉल बदलणे. मक्तेदार श्री सोमनाथ सोनजे  
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे १२ तास लागतील 
नाशिकरोड विभाग
तसेच गांधीनगर व नाशिक रोड जलशुध्दीकरण केंद्राची कामे खालीलप्रमाणे 
१) नाशिक रोड जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटर ९०० मी.मी.एम लाईनचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार श्री पी. एल. आडके 
२) गांधीनगर जलशुध्दीकरण येथे रॉ वॉटर ९०० मी.मी.लाईन १२०० मी.मी. पाईपलाईनवर क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार श्री. पी. एल. आडके 
३) गांधीनगर जलकुंभाजवळ पंपाची इनलेट ७०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन वर ४५० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार श्री पी. एल. आडके तसेच सदर ७०० मी.मी. व्यासाच्या पंपाच्या पाईपलाईनवर स्मार्ट सिटी मार्फत फ्लो मिटर बसविणे. 
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे ३६ तास लागतील 
पंचवटी विभाग
१) पेठरोड सप्तरंग बिल्डींगजवळ मखमलाबाद येथील उर्ध्ववाहीनीवर ६०० मी.मी. X ६०० मी.मी. व्यासाचे तवली डोंगर उर्ध्ववाहीनीचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार मे.आशिष कंन्स्ट्रक्शन, नाशिक   
२) पेठरोड आर.टी.ओ ऑफीससमोर समर्थ नगर नवीन जलकुंभाचे उर्ध्ववाहीनीचे करणे ६०० मी.मी. X ६०० मी.मी. व्यासाचे क्रॉस कनेक्शन मक्तेदार मे. मेघ कंस्ट्रुवेल, नाशिक  
३) पंचवटी प्रभाग क्र. ०६ कुसुमाग्रज गार्डन येथे गुरुत्ववाहिनीवरील लिकेज बंद करणे मक्तेदार  संजय व्ही सुर्यवंशी  
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे १८ तास लागतील 
सातपुर विभाग
१) सातपुर विभागातील १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. कडेपठार अनुविषांत अपार्टमेंट जवळ पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
२) सातपुर विभागातील महेंद्र मटेरीअल गेट समोर १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
३) सातपुर विभागातील बळवंत नगर जलकुंभाजवळ ओमकार तिरुमाला बिल्डींग समोरील १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
४) सातपुर विभागातील कॅनल लगत पाटील फार्म हाऊस समोर १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
५) सातपुर विभागातील कार्बन नाका टपरी झोन जवळ भिंती लगत ५०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
वरील सर्व कामे पुर्ण करणेसाठी अंदाजे १२ तास लागतील.
नविन नाशिक विभाग
१) नविन नाशिक प्र.क्र.२७ महाराजा हॉटल येथील १००० मी.मी.पीएससी लाईन चे लीकेज बंद करणे मक्तेदार पी आर चौधरी 
२) नविन नाशिक प्र. क्र. २७ मधील पाथरडी फाटा वरील ३ नं टाकी वर आउटलेट वाल्व टाकणे - मक्तेदार - संजय सोनजे 
३) नविन नाशिक प्र. क्र. २५ मधील इंद्रनगरी जलकुंभ येथे क्रॉस कनेक्शन करून ४५० मी.मी. व्यासाचा वाल्व टाकणे.मक्तेदार - आनंद कंस्ट्रुवेल 
४) नविन नाशिक प्र. क्र. २४ मधील लेखानगर स्टेट बँक च्या मागे टाकी भरण्याच्या साडेचारशे मी.मी. व्यासाची पाईपलाईन लिकेज काढणे. मक्तेदार -कुणाल शिंदे 
५) नविन नाशिक प्र. क्र. २४ गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक पी एस सी लाईनवरील लिकेज काढणे.मक्तेदार -कुणाल शिंदे 
६) नविन नाशिक प्र. क्र. २४ गोविंद नगर बोगद्या जवळील ६०० मी.मी. व्यासाची टाकी भरण्याची मेन पाईपलाईन लिकेज काढणे. मक्तेदार-कुणाल शिंदे 
७) नविन नाशिक प्र. क्र. ३१ मधील भवानी माता -२ टाकी भरण्याची पाईपलाईन वरील लिकेज काढणे.मक्तेदार-सोमनाथ सोनजे
८) नविन नाशिक प्र. क्र. २५ मधील रायझिंग मेन लाईन व्हॉल दुरूस्ती करणे मक्तेदार-कुणाल शिंदे 
९) नविन नाशिक प्र क्र २७ मधील मारुती संकुल पम्प येथे एन आर वी वॉल्व चे लीकेज काढणे. मक्तेदार राजेंद्र माळी वेळ -२४ तास
वरील सर्वे कामास अंदाजे १८ तास लागणार आहे.
१५ वा वित्त आयोग
१) गंगापुर धरण ते बारा बंगला १८०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन टाकणे या कामाअंतर्गत १२०० मी.मी. व्यासाची दोन पी.एस.सी. पाईपलाईन ला एस.एस. पाईपलाईन Blue Ocean संत कबीर नगर येथे क्रॉसिग करणे.
२) गंगापुर डॅम हेडवर्कस येथे बी.पी.टी. च्या जुन्या व नविन १७०० मी.मी. व्यासाचे क्रॉस कनेक्शन करणे
वरील दोनही कामे पुर्ण करणेसाठी अंदाजे ४८ तास लागतील.
सदर शट डाऊन मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत वरील कामांबरोबरच कामे प्रस्तावित आहेत.उपरोक्त नमुद कामे करणेकरिता अंदाजे ३६ ते ४८ तास पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक व क्रमप्राप्त असुन सदर कामे हे शनिवार दि. ०४ व रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजीच्या शट डाऊन दरम्यान करता येईल,तरी पाणी पुरवठा वितरण,यांत्रिकी विभाग व स्मार्ट सिटी या विभागांची कामे करणेकरीता शनिवार दि. ०४/०४/२०२६ व रविवार दि. ०५/०४/२०२६ रोजी रोजी संपुर्ण दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.व सोमवार दि.०६/०४/२०२६ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे तरी शहरातील सर्व नागरीकांनी मनपास सहकार्य करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी