येवला तालुक्यातील खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर लघुपाटबंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी आ. पंकज भुजबळ यांचा तारांकित प्रश्न

येवला तालुक्यातील खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर लघुपाटबंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे लवकर हाती घेण्यात येतील

आमदार पंकज भुजबळ यांच्या तारांकित प्रश्नावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विधान परिषदेमध्ये आश्वासन
मुंबई, दि.२४मार्च :- येवला तालुक्यातील खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर लघुपाटबंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे लवकरच हाती घेण्यात येतील,अशी माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या विधानपरिषदेच्या सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.येवला तालुक्यातील अतिशय जुने असलेल्या खिर्डीसाठे,डोंगरगाव आणि चांदवड तालुक्यातील खडकओझर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्ती बाबत आमदार पंकज भुजबळ यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, खिर्डीसाठे, डोंगरगाव आणि खडकओझर लघुपाटबंधारे तलाव अतिशय जुने झाले असून बंधारे आणि कालवा यामध्ये लिकेजचे प्रमाण अधिक आहे.या योजना पूर्ण होऊन सुमार १०० वर्ष पूर्ण झाले असून या तलावांसह कालव्यावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत तसेच मातीभराव कमकुवत झाला आहे. कालव्यावरील विमोचक, रस्ता पुल, सायफन, HP ड्रेन नादुरुस्त झाल्याने सिंचन आवर्तन काळात मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होते. कालवा भरावाच्या ठिकाणातुन कालव्यातून मोठ्या प्रमाणात गळती होते,त्यासाठी भरावास ठिकठिकाणी अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.त्यामुळे या बंधाऱ्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची आवश्यकता असून शासनाने यासाठी काय पाऊले उचलली आहेत.तसेच कालवा दुरुस्ती कामे कधीपर्यंत पूर्ण करण्यात येतील असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या प्रकल्पांचा समावेश महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्राधान्याने करण्यात यावा,अशी आग्रही मागणी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून लावून धरली.या प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे की,खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर ल.पा.प्रकल्पांच्या कामाची निकड लक्षात घेऊन या कामांना महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत टप्पा १ मध्ये समावेश करण्याबाबतचे छगन भुजबळ,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य यांचे मंत्री,जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांना दि.५ मार्च २०२५ रोजी दिलेले निवेदन शासनास प्राप्त आहे.खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर ल.पा. प्रकल्पांना शासन निर्णय क्र.संकीर्ण २०२३/प्र.क्र.१४०/निवसं-१ दिनांक १४/०३/२०२४ अन्वये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत टप्पा २ अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सध्या पहिल्या टप्प्यातील कामांचे नियोजन पूर्ण झाले असून, निधीची उपलब्धता होताच द्वितीय टप्प्यातील कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे शासनाचे नियोजन आहे.अतिशय जुन्या असलेल्या या बंधाऱ्यांची कामे शासनाने हाती घेतली असून येवला तालुक्यातील खिर्डीसाठे, डोंगरगाव व खडकओझर या लघुपाटबंधाऱ्यांची दुरुस्ती व आवश्यक ठिकाणी अस्तरीकरणाची कामे पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यास प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येवला तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव सावरगाव याच्या सुद्धा दुरुस्ती कामाला प्रशासकीय मान्यता द्यावी या पंकज भुजबळ यांच्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक उत्तर दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी