जागतिक श्रवण दिनानिमित्त बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक - डॉ. पंकज भट

नाशिक :- ३ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने बालकांमधील ऍडेनॉईड हायपरट्रॉफी आणि टॉन्सिलायटिस या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या समस्यांबाबत पालकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पंकज भट यांनी केले आहे.या आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास मुलांच्या श्रवणशक्तीवर,श्वसनावर तसेच एकूण आरोग्य व विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
डॉ.भट यांनी सांगितले की,ऍडेनॉईड हायपरट्रॉफी म्हणजे नाकाच्या मागील भागातील ग्रंथींची असामान्य वाढ होणे,तर टॉन्सिलायटिस म्हणजे घशातील टॉन्सिलला सूज आणि संसर्ग होणे.हे दोन्ही आजार विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.तोंडाने श्वास घेणे,झोपताना घोरणे (स्नोरिंग),वारंवार घसा दुखणे, ताप येणे, सतत सर्दी-खोकला होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेक वेळा मुले झोपताना किंवा खेळताना तोंड उघडे ठेवून श्वास घेताना दिसतात. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, दिवसभर थकवा जाणवतो आणि शालेय कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो.या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कानाचे वारंवार संसर्ग, मधल्या कानात द्रव साचणे, श्रवणशक्ती कमी होणे तसेच श्वसनमार्गाशी संबंधित इतर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे आणि शाळा किंवा डे-केअरमधील संसर्गाचा धोका जास्त असल्यामुळे हे आजार अधिक प्रमाणात दिसून येतात.लवकर निदानासाठी पालकांनी मुलांच्या श्वासोच्छ्वासाच्या सवयी, झोपेतील घोरणे, तोंडाने श्वास घेणे तसेच वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कान-नाक-घसा तज्ज्ञाकडून एंडोस्कोपी किंवा आवश्यक इमेजिंग तपासण्यांच्या मदतीने या समस्या अचूकपणे ओळखता येतात.डॉ.भट यांनी पुढे सांगितले की,सध्या या आजारांवर आधुनिक,सुरक्षित आणि परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत.त्यापैकी कोब्लेशन (Coblation) तंत्रज्ञान विशेष प्रभावी ठरते. या पद्धतीमध्ये कमी उष्णतेच्या प्लाझ्मा ऊर्जेच्या सहाय्याने ऍडेनॉईड व टॉन्सिल काढले जातात.त्यामुळे रक्तस्राव अत्यल्प होतो, वेदना कमी होतात आणि रुग्ण जलद बरा होतो.अनेक वेळा मुलाला दुसऱ्याच दिवशी घरी सोडता येते आणि काही दिवसांत तो पुन्हा शाळेत जाऊ शकतो.जागतिक श्रवण दिनानिमित्त पालकांनी मुलांच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर कान-नाक-घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,असे आवाहन डॉ. पंकज भट यांनी केले.योग्य वेळी उपचार केल्यास मुलांचे श्रवण,श्वसन आणि एकूण आरोग्य सुरक्षित राहते तसेच त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास सुरळीत होण्यास मदत होते.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बालकांमधील कान-नाक-घसा संबंधित आजारांवर प्रभावी, सुरक्षित आणि रुग्ण-केंद्रित उपचार उपलब्ध आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी