सकल मराठा परिवाराच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा
नाशिक :- सकल मराठा परिवार तर्फे महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त मानसिक स्वास्थ्य आधारित चला जगू या आनंदाने या विषयावर सत्कर्म फाउंडेशन च्या अध्यक्षा ज्योती भोसले-लांडगे,यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यात महिलांनी कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हावे आणि आपल्या आनंदाचा आणि भावनांचा रिमोट आपल्याच हातात ठेवावा असे त्या म्हणाल्या.या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचा विषय अग्रभागी होता.महिलांचे आरोग्य,सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत महिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.'जिच्या हाती ज्ञानाची आणि कर्तृत्वाची दोरी,तीच घडवे नवी सृष्टी भारी'हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.एकंदरीतच,महिला दिनाचा दिवस केवळ शुभेच्छांचा दिवस न ठरता,स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ठरला.या प्रसंगी महिलानी उत्स्फूर्त पणे प्रश्न विचारले.उत्तरे जाणून घेतल्यानंतर प्रतिक्रिया आणि चर्चा करून समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा परिवाराचे खंडू आहेर,स्नेहल काळे,अपूर्वा चव्हाण,सविता पवार, प्रज्ञा वाबळे,शितल पवार,स्वताली शेटे,आरती शिंदे, किरण जाधव,संगीता पाटील,आणि सकल मराठा परिवाराचे पदाधिकारी यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा