शिक्षिका शोभा जाधव यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार

नाशिक :- निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषद 2026 च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच कादवा इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लखमापूर विद्यालयाच्या उपशिक्षिका शोभा शिवाजी जाधव,यांना प्रदान करण्यात आला.यावेळी मा.आ.सुधीर तांबे,शिक्षक आ. किशोर दराडे,आ.राजू मामा भोळे,पीएसआय चव्हाण साहेब (जळगाव) तसेच जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्व मान्यवर तसेच अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत छत्रपती शिवरायांचे व राजमाता जिजाऊंचे महान विचार आपल्या व्याख्यानातून जनमानसात पोहोचविण्याचे कार्याची दखल घेत श्रीमती जाधव यांना या पुरस्कार सन्मानित करण्यात आले.जाधव या सकल मराठा परिवार दिंडोरी तालुका समन्वयक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून इंग्रजी विषयातील आधुनिक काव्यावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.मराठा विद्या प्रसारक समाजाचे केटीएचएम कॉलेजचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.शरद बिन्नोर,प्रा डॅा.राजेंद्र घोलप,व इंग्रजी विभागाच्या वतीने श्रीमती जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी