पोलीसांनी गस्ती दरम्यान गुन्ह्यातील चोरट्याला घेतले ताब्यात

नाशिकरोड :- रेल्वे पोलीस ठाणे तील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, व पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळे,आर पी एफ आरक्षक कृष्ण यादव,नाशिक रोड यांची पुन्हा एकदा नाशिक रोड रेल्वे स्टेशन हद्दीतील धडाडीची कामगिरी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे कॉन्स्टेबल के के यादव यांचे सह गुन्हेगारांवर वॉच व गुन्ह्यास प्रतिबंधक करणे करिता गस्त करत असताना गु र नंबर 224/25 मधील आरोपीत नामे अर्जुन उर्फ अरुण काळ्या संजय पवार राहणार सुभाष रोड नाशिक रोड नाशिक हा संशयित रित्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाणे मध्ये दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 34/2026 कलम 305 सी मधील सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 15000हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून सदर आरोपीत हा नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांचे मोबाईल व सामान चोरी करत असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्याकडे अजून चौकशी करून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी ही लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर येथील माननीय पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग लोहमार्ग वसंत भोये.तसेच नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन बनकर, रेल्वे सुरक्षा बल इन्स्पेक्टर नविन प्रताप सिंह,यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे हि कारवाई पी एस आय राजेन्द्र सोनवणे,सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील,पोलीस शिपाई सुभाष काळे,आर पी एफ के के यादव,यांनी केली आरोपीस दिनाक 2-3-2025 रोजी रात्री 21:56 वाजता अटक करण्यात आली व मा रेल्वे कोर्ट नाशिक रोड हजर करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी