क्रांतीकारक राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्र लावण्याची मागणी
नाशिक :- नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव,मातंग समाज बांधवांच्या वतीने वेळोवेळी नाशिक महापालिका सभागृहात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे,भगवान बिरसा मुंडा तसेच लोकशाहिर अण्णाभाऊ साठे,यांचे छायाचित्र लावण्याची मागणी पुढे येत होती त्याच अनुषंगाने आज महापौर हिमगौरी आहेर आडके यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विशाल माळेकर,नगरसेविका रुपाली निकुळे मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सोमनाथ खाणे,विशाल मोरे,राहुल तारडे,परवेज शेख, यांच्यासह आदिवासी मोर्चा भारतीय जनता पार्टी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा