जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार

पुणे  :- "स्व मदत" या पुण्यातील प्रतिथीयश वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या ग्रुपने दिनांक 9 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते."स्व मदत" च्या प्रकाशक आणि संचालिका ॲड.पियाली घोष तसेच संचालिका ॲड.अनिशा फणसळकर संचालिका ॲड .सुरेखा दाबी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन  केले.सदरील कार्यक्रम शिवसमर्थ हॉल रामबाग कॉलनी कोथरूड येथे पार पडला.सदरील कार्यक्रमात अनुराधाताई सहस्त्रबुद्धे,ज्ञानदेवीच्या संचालिका,राणीताई खेडीकर,बालकल्याण समिती अध्यक्ष पुणे,डॉ.रजनी इंदुलकर,महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी सल्लागार,अंजना प्रधान,जागतिक विक्रमाची गवसणी घालणाऱ्या ताई,यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.सदरील कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी आपापल्या आयुष्याचा जीवनपट उलगडला.त्या सर्वांचेच अनुभव समृद्ध करणारे पण मन हेलावून सोडणारे होते.यावेळी अनुराधाताई यांनी चाईल्डलाईन कडे येणाऱ्या तसेच ज्ञानदेवीकडे येणाऱ्या संकटात सापडलेल्या मुलांच्या कथा आणि व्यथा तसेच पॉक्सो ऍक्ट मधील तरतुदी आणि प्रत्यक्षातील त्याची अंमलबजावणी यात असणारी तफावत निदर्शनास आणून दिली.राणीताई खेडीकर,यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची मुले आणि त्यांच्या व्यथा यावर प्रकाश टाकला.ताईंची त्यात पीएचडी असून प्रदीर्घ असा अनुभव गाठीशी आहे.अशा मुलांना अन्य मुलांसारखे वागवले न गेल्यामुळे त्यांना पडणारे प्रश्न,हतबलता यावर त्यांनी भाष्य केले.डॉ.रजनी यांनी परदेशात असताना प्रतिकूल परिस्थितीत अडकल्यामुळे जीवनाला कशी नवीन दिशा मिळाली आणि त्यानंतर पेटून उठून त्यांनी आजवरचा आपला प्रवास कसा सिद्ध केला याचेवर भाष्य केले.स्त्रियांनी स्वतःकडे कसे लक्ष द्यावे आणि कसे सक्षम बनावे याकरता महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.अंजनाताई यांचे कार्य देखील सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे.लहानपणी पोलिओ सारख्या आजाराला बळी पडल्यामुळे मिळणारी वेगळी वागणूक आणि त्यातूनच हट्टाने पेटून खूपच प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सिद्ध करत जिथे सामान्य माणूस सर्व काही असून साध्या साध्या गोष्टीत कुरकुर करतो तिथे अंजनाताईंनी केवळ जिद्दीच्या जोरावर अकरा वेळा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे पार केले तसेच स्वतःचाच हा विक्रम मोडण्यासाठी 21 वेळा हे शिखर पार केले आणि जागतिक विक्रम केला.तसेच जागतिक अपंग दिनानिमित्ताने चढाईस अत्यंत अवघड असा किल्ले तोरणा सर केला आणि दोन दिवसांनी लगेचच हरिहर गड सर केला.दिव्यांग असूनही ताईंनी स्विमिंग मध्ये अव्वल येत अनेक वेळा बक्षीसे प्राप्त केली आहेत.सदरील कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना वकील प्रेक्षकांमधून आलेले निवडक प्रश्न विचारून टॉक शो सदरामध्ये कार्यक्रमाचे नियोजन केले गेले.सर्व प्रश्नांना मान्यवरांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.मात्र सर्वांचे अनुभव आणि समाजातील निर्विकार वृत्ती आणि असहकाराची भावना यामुळे कशा अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली गेली.याविषयी सर्वच वक्त्यांनी खूप सहज सोप्या शब्दात प्रेक्षकांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त वकील वर्गाची उपस्थिती होती.प्रसंगी सर्व मान्यवरांचा हृदयस्थ सत्कार शॉल मोमेंटो आठवण रुपी भेट देऊन करण्यात आला.तसेच याप्रसंगी महिला क्रिकेट टीम आणि बॅडमिंटन टीम मधील विजेत्या वकील महिला वर्गाचा सत्कारही करण्यात आला.तसेच याप्रसंगी वकील वर्गातून धडाडीने कार्य करणाऱ्या महिला ॲड.मिताली साळवेकर,ॲड.ईशानी जोशी,ॲड.सुषमा यादव,ॲड.माधवी परदेशी,ॲड.सारिका परदेशी,यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्व व्यवस्था स्वमदत च्या तिन्ही संचालकांनी पार पाडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी