प्रभाग क्रमांक २३ मधील पाणीपुरवठा,अतिक्रमण प्रश्नी ठिय्या आंदोलन निवेदन सादर
नाशिक :- प्रभाग क्रमांक २३ मधील विविध ठिकाणावरील तसेच लाॅन्स अतिक्रमण प्रश्नी उपायुक्त सुरेखा देखणे,यांची प्रभागातील नगरसेवक नागरिकांनी भेट घेत निवेदन सादर केले.यावेळी उपायुक्त देखणे यांनी लवकरच अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.तसेच यावेळी कमोद नगर, इंदिरानगर,खोडे नगर, विधाते नगर,साईनाथ नगर,अमृतवर्षा काॅलनी, दिपाली नगर,विनय नगर, शिवाजी वाडी,नंदीनी नगर शिवसृष्टी काॅलनी,भारत नगर, सुचिता नगर,चिस्तीया काॅलनी,आदी भागात अवेळी कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठा बाबत अधिक्षक अभियंता रविंद्र धारणकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.निवेदन देण्यात आले.
प्रभागात पाणीपुरवठा योग्य दाबाने सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.याप्रसंगी नगरसेवक चंद्रकांत खोडे, नगरसेविका रुपाली निकुळे,मंगला नन्नावरे,माजी नगरसेवक यशवंत निकुळे, प्रभागातील महिला नागरिक सचीन कुलकर्णी,प्रकाश नन्नावरे,सरला थोरात, लक्ष्मी जाधव,अनुसया पवार, अनिता जाधव,विमल पवार, सुशीला महाले,सोनाली मोरे,आदींसह उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा