नगरसचिवांसह सोळा अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेतून सेवानिवृत्त

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक,दि.३०:- महानगरपालिकेच्या सेवेतून मनपाचे नगरसचिव मदन हरिश्चंद्र यांच्यासह १६ अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.नाशिक महानगरपालिकेच्या सेवेत नगरसचिव या पदावर कार्यरत असणारे जेष्ठ मदन हरिश्चंद्र हे ३७ वर्षाच्या मनपा सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनीषा खत्री,यांच्या हस्ते मनपा पदाधिकारी,गटनेते,नगरसेवक व अधिकारी यांच्या उपस्थितीत महासभेत करण्यात आला.कामगार कल्याण विभागाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेतील विविध संवर्गातील व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नियत वयोमानाने माहे मार्च २०२६ मध्ये सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती सत्कार मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे करण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले राजाराम जाधव,विभागीय अधिकारी मनोहर पगारे,बिगारी,वसंत वाघ, कामाठी,संजय हिरवे,शिपाई,संतोष खर्डे,स्वच्छता मुकादम,श्रीमती देवलबेल वाघेला,सफाई कर्मचारी, ज्ञानेश्वर पवार,शिपाई ,कैलास गायकवाड,बिगारी,संजय कडाळे,शिपाई ,शोभा कोथमीरे,बिगारी,विनायक गांगुर्डे,उपभियंता,संगीता महाले,स्टाफ नर्स,शेखर चौरे अधीक्षक,शरद डोईफोडे,वरिष्ठ लिपिक,विलास साळवे,सफाई कर्मचारी,सुभाष इंगले,सफाई कर्मचारी आदी कर्मचारी अधिकारी मार्च महिन्यात नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले.यातील उपस्थितांचा स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ वृक्षरोप देऊन सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास कामगार कल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ संगीता नांदूरकर,कामगार कल्याण विभागाचे अधीक्षक  नितिन बागुल,जनसंपर्क अधिकारी नितिन गंभीरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले.यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवापूर्ती निरोप देण्यासाठी मनपाचे विनय काळे,राजेंद्र सोनार,मिलिंद बदादे, हेमंत कानडे आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांचे परिवारातील सदस्य,नातेवाईक, आप्तेष्ट आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी