उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १५११ असाक्षर व्यक्तींच्या सहभाग
नाशिक :- केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत मनपा क्षेत्रातील २२४ परीक्षा केंद्रांवर पार पडल्या.त्यात १५११ असाक्षर व्यक्तींनी सहभाग नोंदविला.केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत रविवार,दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.००ते दुपारी ५.०० या वेळेत मनपा क्षेत्रातील २२४ परीक्षा केंद्रांवर असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLNAT) चाचणी घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण १५११ असाक्षर व्यक्ती सहभागी झाल्या असून,ही महत्त्वपूर्ण चाचणी आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षा केंद्रावर २२४ केंद्रसंचालक यांची नेमणूक करण्यात आलेली होती.तसेच वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्या आहे.मनपा प्रशासनाच्या वतीने व मनपा प्राथमिक व माध्यमिक तसेच खाजगी विविध शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहभागातून ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमातून असाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे.
डॉ. मिता चौधरी - प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग, नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा