रामशेज किल्ल्यावर सकल मराठा परीवार कडून दीपोत्सव संपन्न
नाशिक :- दीपोत्सवाच्या निमित्ताने सकल मराठा परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी हा उपक्रम पेठरोडवरील रामशेज किल्ल्यावर राबविण्यात आला.
दिवाळी सणाला जेव्हा लोक घरात दिवाळी साजरी करत होती. तेव्हा सकल मराठा परिवार टीम नाशिक जिल्ह्यातील किल्ले रामशेज येथे छत्रपती शिवराय, छत्रपति संभाजी महाराज, व स्वराज्यासाठी देह ठेवणाऱ्या आपल्या लाख मावळे यांना दिवा अर्पण करून दिवाळीची सुरवात करत आहेत.या संकल्पात किल्ले रामशेज येथे 101टेंभे ,21 मशाली व 1001 दिवे लावून छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्यासाठी देह ठेवणाऱ्या लाखो मावळ्यांच्या स्मरणार्थ दिवा लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.याकरिता दुपारी पावणेचार वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी शिवप्रेमी जमले,व त्यानंतर गडाच्या चढाई ला सुरवात झाली गडा वर गेल्यावर प्रथम गडाची सफाई करण्यात आली व नंतर किल्ल्यावर रांगोळ्या काढण्यात आली व किल्ल्यावरील झेंड्याचे ठिकाणी ध्वजपूजन. गडपुजन, करण्यात आले तसेच महाद्वार ला तोरण बांधून पूजा केली गडावरील छत्रपती शिवराय यांच्या मुर्ती ची महिला बगिनी व शिवप्रेमी कडून पूजा करण्यात आली व मुर्ती वर सगळ्या शिवप्रेमींनी पुष्पवृष्टी केली, सगळी कडे दिवे लागण्यात आले त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली याप्रसंगी शिवचरित्र कार साक्षी ढगे यांचे शिव व्याख्यान झाले व नंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
Comments
Post a Comment