मविप्र नर्सिंग महाविद्यालयातर्फे स्वच्छता ही सेवा अभियान

मविप्र संचलित डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभागी मान्यवर प्राध्यापकवृंद

नाशिक : मविप्र संचलित डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, परिचर्या शिक्षणसंस्था, फिजिओथेरपी महाविद्यालय आणि फार्मसी महाविद्यालय यांच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात सर्व महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. 
मोहिमे दरम्यान अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, परिचर्या शिक्षणसंस्था प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.नितीन हिरे, फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्या डॉ.अमृत कौर,यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. सुधीर भामरे, यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्व, त्याचबरोबर आपण ज्या परिसरात उदरनिर्वाह करतो, त्या परिसराचे स्वच्छतेचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक यांनी निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत डांगे, विनायक गुंजाळ, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश बत्तीसे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन