शिववाहतूक सेना नाशिक महानगरप्रमुखपदी राजू ठाकरे यांची नियुक्ती
नाशिक :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत अंगीकृत असलेल्या शिववाहतूक सेनेच्या महानगरप्रमुखपदी राजू ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजू ठाकरे यांनी यापूर्वी शिवसेना शाखाप्रमुख, युवासेना विभागप्रमुख यांसह पत्रकारिता क्षेत्रात एक तपाहून अधिक काळ सेवा करीत वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अनुभवाची व कार्याची दखल घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने तथा शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशना नुसार व शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष तथा उपनेते भाऊ कोरगावकर यांच्या सूचनेनुसार , कार्याध्यक्ष संदीप ( बाबू ) मोरे यांच्या उपस्थितीत संघटनेचे सरचिटणीस निलेश मोरे यांनी राजू ठाकरे यांना नियुक्ती पत्र प्रदान केले आहे.
यावेळी शिववाहतुक सेनेचे कोषाध्यक्ष विनायक मुरुडकर, जिल्हाप्रमुख विजय काळदाते, संदीप धात्रक, सुधीर सूर्यवंशी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment