प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा : ॲड. नितीन ठाकरे
फोटो 
नाशिक : मविप्रच्या गंगापूर रोड येथील आदर्श शिशुविहार व अभिनव बाल विकास मंदिर या शाळेत ‘पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी’ सण साजरा करताना संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत मान्यवर व शिक्षकवृंद
मविप्रच्या शाळांमध्ये ‘अभिनव’ दिपोत्सव
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)भारतीय संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख करून देण्याचे काम अभिनव शाळा नेहमीच विविध उपक्रमांतून करत असते. ‘अभिनव’ दिपोत्सवामुळे शाळेतील वातावरण मंगलमय झाले आहे. या शाळेतील चिमुरड्यांनी दिलेल्या ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’च्या संदेशाचे सर्वांनी पालन करण्याची गरज आहे, असे आवाहन मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
मविप्रच्या गंगापूर रोड येथील आदर्श शिशुविहार व अभिनव बाल विकास मंदिर या शाळेत ‘पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी’ सण साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी शाळेत राबविणाऱ्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण उपक्रमांबददल मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबद्दल शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणावर नाटिका तर प्रदूषणमुक्त दीपावलीवर नृत्य सादर केले. पालकांनी शाळेत विविध स्टॉल्स लावले होते.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील, मविप्र संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, मविप्र सेवक सदस्य चंद्रजित शिंदे, शिक्षणाधिकारी प्रा. दौलत जाधव, अर्चना ठाकरे, मंगला दवंगे, विलास जाधव, अर्चना वाळके, चेतन बच्छाव, सुजाता जाधव, योगेश जाधव, संपत खेलूकर, हिरामण शिंदे, प्रमोद मुळाणे, मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे, श्रुती देशमुख, ज्योती पवार तसेच कारभारी तांदळे, अबॅकसच्या प्रमुख निता पवार तसेच सर्व माजी मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवर व मुख्याध्यापिका गायधनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन झाले. संगीत शिक्षिका नंदिनी आहिरे व गीतमंच यांनी गायन केले. अंबादास मते व अर्चना मते यांच्या हस्ते दीपावली पूजन झाले. मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी प्रास्ताविकात शाळेचा उंचावत गेलेला आलेख मांडला. उपशिक्षिका मंगला गुळे व पूनम निकम यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका रंजना पाटील यांनी आभार मानले.
मनपा प्रशासनाधिकारी पाटील यांनी मविप्र ही अग्रस्थानी पोहोचलेली संस्था आहे. तसेच अभिनव शाळा उत्कृष्ट कामकाज व उपक्रम राबविणारी शाळा असल्याचे सांगत उत्कृष्ट नृत्य सादरीकरणाबद्दल त्यांनी ५०० रुपयांचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दिवाळीतील सणांचे घडले दर्शन
विद्यार्थ्यांना दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व समजावे, यासाठी सर्व वर्गांमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या सणांची माहिती देणारी आकर्षक मांडणी करण्यात आली होती. यासाठी शिक्षकांची तीन दिवसांपासून तयारी सुरु होती. किल्ल्यांचीही उभारणी करण्यात आली होती. आकर्षक रांगोळ्या, तोरण, आकाशकंदिल, पणत्यांनी शाळेची सजावट करण्यात आली. खासकरून वसुबारस पूजनासाठी प्रत्यक्षात गाय-वासरू आणले होते.
मोबाइल व टीव्हीमुक्त उपक्रम राबवावा : मनपा शिक्षणाधिकारी पाटील
आजच्या आधुनिक युगात मोबाइलचा वाढलेला वापर कमी करून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार लागण्यासाठी पालक व शिक्षक यांनी मोबाइल व टीव्हीमुक्त उपक्रम राबवावा. पालकांनी मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा. शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरांची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. जेणेकरून काही चुकीच्या गोष्टींना वेळीच आळा बसण्यास मदत होईल, असे आवाहन नाशिक मनपाचे शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment