श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ येथे साडी चोळी अर्पण करण्यात येणार

नाशिक :- श्री क्षेत्र तुळजापुर येथे सवाद्य मिरवणुकीने आई श्री तुळजाभवानी मातेस साडी-चोळी व मणी-मंगळसुत्रा सहित सवाष्ण ओटी अर्पण करण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या तीर्थक्षेत्रांचा अतिशय पौराणिक असा सह संबंध असून धार्मिक कथा-परंपरेच्या आधारावर मागील अनेक वर्षापासून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या उगम स्थानाचे तीर्थ हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कावड धारकांच्या माध्यमातून प्रतिवर्षी श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे पायी प्रवास करून विधिवत पूजन- प्रक्रियेद्वारे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आई श्री सप्तश्रृंगी मातेच्या अभ्यंग स्रानाला ते तीर्थजल वापरण्याची प्रथा सुरू आहे. तरी मागील वर्षापासून दरवर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील तीर्था बरोबर आई श्री सप्तशृंगी मातेला भरजरी वस्त्र/पैठणी साडी (हातमागावर विणलेली १४ वार सह ४ वार स्वतंत्र चोळी) तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरु करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने मा. विश्वस्त मंडळाच्या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे आई श्री. सप्तशृंगी मातेसह महाराष्ट्रातील ३.५ शक्तिपीठ येथे अशा प्रकारे कोजागीरी पोर्णिमे दिवशी श्री. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे भरजरी वस्त्र/पैठणी साडी तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे सुरू करण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा या दिवशी विशेष पूजेदरम्यान श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त प्रतिनिधी तर्फे साडे-तीन शक्तिपीठांपैकी एक आई श्री तुळजाभवानी मातेला अर्पण केलेली भरजरी बस्त्र/पैठणी साडी परिधान करण्याची सेवा रुजू करणेकामी तत्वतः मान्यता मिळाली असून त्यानुसार सचिव तथा तहसिलदार श्रीमती माया माने मँडम यांनी लवकरच ठराव घेवुन महाराष्ट्रातील तिनही शक्ती-पीठांप्रमाणे आई श्री तुळजाभवानी मातेला देखिल कोजागीरी पोर्णिमेला श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे अर्पण केलेली साडी-चोळी परिधान करण्याचा संकल्प पूर्णत्वास येईल असे सांगीतले.
चौकट : पहिल्या वर्षी नऊ वाराची पैठणी साडी-चोळी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी स्वखर्चाने देण्याचे ठरविले. त्यानुसार आई श्री तुळजाभवानी मातेला साडी-चोळी/मणी-मंगळसुत्र, जोडवे, ई. सवाष्ण ओटी, सवाद्य मिरवणुकीने वाजत-गाजत विश्वस्त श्री पुरुषोत्तम कडलग यांच्या हस्ते दिनांक ०७/१०/२०२४ रोजी आई श्री तुळजाभवानी मातेला अर्पण करून, मातेला परिधान करणेसाठी श्री तुळजापूर देवस्थान ट्र्स्ट कडे सुपुर्द केली.
लवकरच कोजागिरी पोर्णिमे पर्यंत श्री क्षेत्र कोल्हापुर, श्री क्षेत्र माहुर व श्री क्षेत्र सप्तश्रुंग गड येथे साडी-चोळी सह सवाष्ण वाण अर्पण केले जाणार असल्याचे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे माननीय अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक नितीन जीवने, ट्रस्टचे सचिव तथा त्रिंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीया देओचके, ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले,  पुरुषोत्तम कडलग, रुपाली भूतडा, स्वप्नील शेलार, डॉ. श्री. सत्यप्रिय शुक्ल, मनोज थेटे, प्रदीप तुंगार, यांनी सांगीतले.
भगवान श्री त्र्यंबकेश्वराकडून आई श्री तुळजाभवानी माता शक्तीस्वरूपाला पाठविलेल्या भेटीचे व ट्रस्टने सुरू केलेल्या परंपरेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
या विशेष सोहळ्या प्रसंगी तुळजापुर येथे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरूषोत्तम कडलग,यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे, पी.आर.ओ. उत्तम भांगरे, हेमंत गांगुर्डे, ओमकार आंबेकर, व पोपट लचके, आदी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला