खा. शरद पवारांना सोडणा-या गद्दार आमदारांना पक्षात घेऊ नये - प्रदेशकार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग
नाशिक :- शरद पावार साहेबांना काही गद्दार आमदार गुप्त पणे भेटल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या.
नाशिक जिल्ह्यातील एक ही गद्दार आमदारांला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षश्रेष्ठींनी घेऊ नये कारण ज्या मतदारांनी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आमदारांना मतदारांनी मतदान केले मात्र गेलेल्या या गद्दार आमदारांनी पवार साहेबांचे मन दु;खावले आणि केवळ स्वताच्या स्वार्थासाठी साहेबांची साथ सोडली आहे. अशांना नाशिक जिल्ह्यातील एका ही आमदाराला पक्षाने घेऊ नये असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सहा जागा लढवल्या होत्या मात्र केवळ दोन जागावरती उमेदवार पराभूत झाले आणि सहा जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयी झाले. ते केवळ खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवला व निवडून दिले त्या मतदाराचा देखील विश्वासघात या गद्दार आमदारांनी केला आहे.त्यामुळे या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घेऊ नये आज जिल्ह्यातील शहरासह पाच आमदार भाजपाचे, एक काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, शिवसेना दोन असे पक्षाचे बलाबल असुन आज ही शरद पवार साहेबांच्या विचाराचा जिल्हा असुन राष्ट्रवादी काँग्रेस ची मोठी ताकद आहे.शहरात देखील अगदी दहा पाच हजार मतांच्या फरकाने शहरातील दोन आमदार पराभूत झाले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून साहेबांना सोडून जाणाऱ्या आमदारांना पुन्हा पक्षात घेऊच नये अशी तिव्र भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे,जिल्हा कार्यध्यक्ष गणेश गायधनी,शाहू शिंदे, तुषार जाधव,किरण भुसारे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आणि साहेब देतील तो उमेदवार निवडून आणू
यासंदर्भात लवकरच पक्षाध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असून पवार साहेबांना सोडून देणा-या गद्दार आमदारांना घेण्यास सर्वांचाच विरोध असुन जिल्ह्यात पवार साहेबांना मोठ्या प्रमाणावर मानणारे शेतकरी बांधव असल्याने चांगले वातारण आहे. साहेब देतील तो उमेदवार आम्ही प्रत्येक मतदारसंघात निवडूण आणू असे शरद पवार साहेब,जयंत पाटील साहेब,सुप्रियाताई सुळे, यांना लवकरच जाऊन सांगणार आहोत.
पुरुषोत्तम कडलग,
प्रदेश युवक कार्याध्यक्ष
Comments
Post a Comment