संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन, माजी खा.इम्तीयाज जलील यांच्यावर कारवाईची मागणी

नाशिक :- संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने छत्रपती संभाजी नगर नावाला काळे करणारे इम्तियाज जलील,संबंधितांवर कार्यवाही होणे बाबत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले.कारवाई करण्याची मागणी करण्यात आली माजी खा. इम्तियाज जलील याच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या दरम्यान काही विकृतानी छत्रपती संभाजी नगर नावाचे दिशा दर्शक फलकाला काळे फसण्याचे काम केलेले असून महाराष्ट्रातील महापुरूष ही आमची अस्मिता असून आमचा स्वास आहे. जिजाऊ,शिवराय,शंभूराजे,फुले,शाहू, आंबेडकर,याआमच्या प्रतिकांना डीवचन्याच काम कोणी करत असेल तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर द्यायला तयार असल्याचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी यावेळी सांगितले. देशाची एकता व एकात्मता खंडित करण्याचे काम या इम्तियाज जलील सारख्या व शंभूराजांच्या नावाला काळ फासणाऱ्या विकृतानी हाती घेतल्याचे दिसते जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये व धर्मामध्ये जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून देशाला व महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सातत्याने होत आहे.अशा प्रवृतीला जरब बसणे गरजेचे असून कठोर कार्यवाही होणे करता निवेदन दिलेले आहे. भाजप व मित्र पक्षाला इम्तियाज जलीलच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोषक वातावरण निर्माण करून देण्याचे काम इम्तियाज जलील सारख्या प्रवृत्ती करत आहेत. हा आमचा आरोप आहे. यापुढे हाताबरोबर मेंदूचाही शोध घेणे आपल्यापुढे आव्हान असून योग्य शासन करून संबंधितांवर कारवाई करावी राज्याचे गृहमंत्री व देशाचे गृहमंत्री यांनी कोणालाही पाठीशी न घालता आमचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज व या महाराष्ट्राला डीवचण्याचे काम जो कोणी करत असेल त्याच्यावर कठोर शासन करून कार्यवाही करावी तसे न झाल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आंदोलन करेल. व त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल ही आमची ठोस भूमिका आहे.असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रसंगी जिल्हाप्रमुख शरद लभडे,प्रफुल्ल वाघ, विकी गायधणी, बळीराम घडवंजे,मंदार धिवरे, नितीन काळे, हिरामण वाघ,निलेश गायकवाड, राकेश जगताप, साहिल बैरागी, प्रेम भालेराव, राम इंगोले, रवींद्र लोखंडे,गणेश पाटील,गणेश काकड,डॉ. शिंदे,जितेंद्र पाटील, बंटी कराटे, व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन