जागतिक वारसा साल्हेर महादुर्गसंवर्धन मोहिमेत भरपावसात श्रमदान


किल्ल्याच्या पायऱ्यावरील अस्ताव्यस्त दगडे अभ्यासपूर्ण रचली,
कचरा ही केला संकलित,
नाशिक :दि.३० यूनोस्कोचे मानांकन मिळालेल्या राज्यातील १२ किल्ल्यात नाशिकच्या बागलाण भागातील किल्ले साल्हेरला मानांकन मिळाले यनिमित्ताने नाशिकच्या पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने सकल मराठा परीवार सह जिल्ह्यातील ९ दुर्गसंवर्धन संस्थेच्या उपस्थितीत किल्ले साल्हेरवर महादुर्गसंवर्धन मोहीम झाली. या मोहिमेत भर पावसात उतुंग साल्हेर गडाच्या पायऱ्यावरील अस्ताव्यस्त दगड काढून एक बाजूला अभ्यासपूर्ण उभे आडवे रचून किल्ल्याच्या वरून निखळणारी मातीची झिज थांबवने,पाणी जमिनीत जिरवणे, तसेच किल्ल्यावरील कचरा संकलन करण्यात आला.महाद्वारासमोरच्या मोकळ्या जागेतील दगडे रचण्यात आली,
दिवसभर केलेल्या जागतिक वारसा साल्हेर मोहिमेत ११० हुन अधिक दुर्गसंवर्धाकांनी श्रमदानात सहभाग घेतला.

जागतिक वारसा टीम साल्हेर ची हवाई पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमिवर साल्हेरच्या दुर्गसंवर्धक मोहीम घेण्यात आली.यावेळी किल्ल्याच्या बांधीव तट बांधणीजवळ गोलाकारबसून श्रावणी बच्छाव, योगेश कापसे यानीं साल्हेरच्या इतिहासावर विषयावर मार्गदर्शन केले, तर दुर्गसंवर्धन अभ्यासक राम खुर्दळ यांनी दुर्गसंवर्धनकार्याची व्याप्ती सांगितली, खंडू आहेर यांनी संवाद सत्राचे आभार मानले.तर संजय झारोळे यांनी मोहीम व्यवस्थापनात भोजन व्यवस्था सांभाळली,दि २९ सप्टेंबर रोजी झालेल्या महादुर्ग संवर्धन महादुर्ग साल्हेर मोहिमेत साल्हेर किल्ला ढगानी व्यापलेला व सातत्याने सुरु असतानाही भर पावसात दुर्गसेवक यांनी माथ्यावरचे परशुराम मंदिराला भेट दिली.

साल्हेरच्या इतिहासाला उजाळा देतांना १६७२ साली साल्हेरच्या लढाईचे प्रसंग यावेळी उपस्थित दुर्ग सेवकाना सांगण्यात आले, मुघलं व मराठे यांच्यात झालेल्या तुंबळ युद्धात छत्रपतीं शिवरायांचा जिवलग असलेले सूर्यरावं काकडे हे साल्हेरच्या पायथ्याला धारातीर्थ पडले,प्रतापरावं गुजर, व मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वात खुल्या मैदानावर मुघलांच्या हजारोच्या फौजेचा पराभव त्यांनी केला होता. विजय मिळाला पण वीर सूर्यराव काकडे, लढता लढता धारातीर्थ पडले, यावेळी मोहीमेवरील दुर्ग सेवकांनी काकडेच्या समाधी स्थळी फुले वाहिली तेथील टाक्यातील आजूबाजूची काटेरी झूडप काढली,या महादुर्ग संवर्धन मोहिमे खालील संस्था सहभागी झाल्या दुर्ग संवर्धन संस्था,

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक,
सकल मराठा परिवार, नाशिक,संस्कृती दुर्गसंवर्धन, विल्होळी,टीम देहेरगड, स्वराज्य कार्य लोकमाध्यम विज्ञान व निसर्ग संस्था, नाशिक राजा शिव छत्रपतीं परिवार, नाशिक रौद्र शंभुपरिवार, नाशिक,हिंदवी स्वराज्य परिवार, बागलाण,दुर्गसंवर्धन प्रतिष्टान, नाशिक,

९ सेवाभावी संस्थानी महावारसा मानाकन साल्हेर वर श्रमदानं केलं, यनिमित्ताने जिल्ह्यातील ६८ हुन अधिक दुर्गाची दुरवस्था दूर होण्यास मदत होईल,गडाचे मूलभूत प्रश्न समाजातील सर्व घटक, शासन, प्रशासनास कळतील त्यावर उपाय करणे सोयीचे होईल, त्यासाठीच नाशिक जिल्ह्यातील दुर्गसंवर्धन क्षेत्रातील अभ्यासू अनुभवीना सरकारने दुर्गसंवर्धन, वारसा संवर्धन समितीवर घ्यावे, परस्पर नियुक्त्या होऊ नये,असे राम खुर्दळ यांनी ठरावं मांडला तो एकमुखी सर्वांनी मंजूर केला,
यावेळी शिवव्याख्याते समाधान हेगडे पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून इतिहासाच्या अनेक घटना घडामोडी मांडल्या. प्रवासात सुद्धा साल्हेर मोहीम पोवाडे, दुर्ग गिते गायन झाले, 
यावेळी पुरातत्व विभागाचे  विजयकुमार धुमाळ, सचिन पगारे, दिलीप सोनवणे, सचिन कुलकर्णी, रोहन पगारे,यांचा ही मोहिमेत सहभाग मिळाला, युवराज पवार, प्रा, सोमनाथ मुठाळ,इतिहास अभ्यासक रविद्र पाटील यांचे ही मार्गदर्शन मिळाले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला