मखमलाबाद विद्यालयाने ११ लाखांचे बक्षिस मिळवून आणखी एक मानाचा तुरा रोवला
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद या शाळेने महाराष्ट्र शासनाच्या "मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा" टप्पा क्रमांक २ अभियान सन २०२४-२५ या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून ११ लाखांचे पारितोषिक मिळविले.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व प्राचार्य संजय डेर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सहभाग घेऊन हे पारितोषिक प्राप्त झाले.या स्पर्धेसाठी शालेय शैक्षणिक प्रगती,शालेय सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा,विद्यार्थ्यांसाठी केलेले शैक्षणिक,कला,क्रिडा क्षेत्रातील मार्गदर्शन व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये जिल्हा,राज्य,राष्ट्रीय स्तरावर मिळविलेली बक्षिसे,वर्षभरातील विविध उपक्रम,वृक्षारोपण,परसबाग यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता.या उपक्रमासाठी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम,मनपा आयुक्त डाॅ.अशोक करंजकर,अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी,जि.प.शिक्षणाधिकारी प्रविण पाटील,मनपा शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील,केंद्रप्रमुख दिपक पगार या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या स्पर्धेसाठी प्राध्यापक,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली.या उत्तुंग यशाबद्यल मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डाॅ.सुनिल ढिकले,उपाध्यक्ष विश्र्वासराव मोरे,सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी,संचालक रमेश आबा पिंगळे,संचालक ॲड.लक्ष्मण लांडगे,सर्व मविप्र संचालक मंडळ,माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ.भास्करराव ढोके,सर्व मविप्र शिक्षणाधिकारी,माजी सेवक संचालक डाॅ.अशोकराव पिंगळे,अभिनव बालविकास मंदिर शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले,उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे,कला व वाणिज्य महाविद्यालय समिती अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन स्कुल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळु काकड,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,ज्युनियर काॅलेज प्रमुख प्रा.उज्वला देशमुख,मविप्र सभासद,सर्व स्कुल कमिटी सदस्य,माता पालक संघ,सर्व मखमलाबाद ग्रामस्थ यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
Comments
Post a Comment