मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा
मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिनानिमीत्त प्रतिमापुजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे,जेष्ठ शिक्षक अनिल पगार,प्रताप काळे,बाळु पवार,तुकाराम तांबे,जेष्ठ शिक्षिका बेबी जाधव,सविता आहेर,दिपाली कोल्हे,स्वाती होळकर,रुपाली शिंदे,क्रांतीदेवी देवरे,वर्षाराणी पाटील,सायली मोरे व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.कु.संस्कृती गांगुर्डे हिने कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.प्राचार्य संजय डेर्ले यांनी आपल्या मनोगतात डाॅ.वसंतराव पवार यांच्या सामाजिक,शैक्षणिक,सहकार,वैद्यकिय,राजकीय,सांस्कृतिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.त्यांचे बालपण,प्राथमिक शिक्षण ओणे ता.निफाड तसेच माध्यमिक शिक्षण मराठा हायस्कुल नाशिक येथे झाले.वैद्यकीय शिक्षण पुणे येथे घेऊन नाशिकला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.त्यानंतर त्यांनी वैद्यकिय क्षेत्राबरोबरच सामाजिक,सहकार,शैक्षणिक,राजकिय क्षेत्रात आपले कार्य सुरु केले.मविप्र संस्थेत सरचिटणीस असतांना त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी महान कार्ये केली.त्यांच्या कार्यकाळात प्राथमिक,माध्यमिक,महाविद्यालय,व्यावसायिक महाविद्यालये सुरु करण्यात आली.शिस्त,गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसुत्रीवर आधारीत संस्थेची प्रगती केली.त्यांच्या या महान कार्यामुळेच वैद्यकिय महाविद्यालयास डाॅ.वसंतराव पवार यांचे नाव देण्यात आले.आमदार,खासदार असतांना त्यांनी राजकिय क्षेत्राबरोबरच त्याचा फायदा शैक्षणिक क्षेत्रासाठी करुन घेतला.निफाड तालुका व नाशिक जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांवर त्यांनी अतिशय चांगले काम करुन मोठे योगदान दिले आहे."असेन मी नसेन मी,माझ्या कार्यातून दिसेन मी" असेच त्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते.सुत्रसंचालन कु.समृध्दी अहिरे हिने केले.इ.१० वी ड च्या या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका दिपाली कोल्हे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment