महानगरपालिकेचा "वृक्ष उत्सव २०२३" (देशी झाडे, रोपांचे प्रदर्शन), २८ ते ३० जुलै दरम्यान प्रदर्शन

नाशिक महानगरपालिका आणि हिरवांकुर फाऊंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने "वृक्ष उत्सव २०२३" (देशी झाडे व रोपे यांचे प्रदर्शन) दि. २८ जुलै ते दि. ३० जुलै या कालावधीमध्ये भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजीत करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीन दिवस हे प्रदर्शन नागरीकांकरीता विनामुल्य खुले राहणार आहे. सदर प्रदर्शनात आयुर्वेदीक वनस्पती लागवड, सेंद्रीय शेती, पर्यावरण संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध संकल्पना या ठिकाणी नागरीकांना पाहवयास आणि प्रत्यक्ष जाणुन घेण्यास मिळणार आहेत. रेन वॉटर हार्वेस्टींग, प्लास्टिक फ्री सिटी, कंपोस्टिंग, सौर उर्जा प्रकल्प आदी विषया संबंधित सर्व माहिती नागरिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन मनपाच्या पर्यावरण विभागाने केले आहे. 

तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यतातुन पर्यावरण संर्वधन संबंधित विविध विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन "विद्यार्थी दशेतूनच हरीत संस्कार" ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न होणार आहे. सदर प्रदर्शनामध्ये बिब्बा, रिठा, हिरडा, खैर, अजुर्न, शिवण, पांगारा, अंजन, काटेसावर अशी एकूण ८० पेक्षा अधिक विविध प्रकारची झाडे/रोपे बघावयास व त्यांची माहिती जाणुन घेण्यास मिळणार आहे. देशी झाडांचे महत्व तसेच ओळख सर्व नागरीकांना व्हावी हा उद्देश ठेऊन हे प्रदर्शन मनपाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. यावेळी विविध प्रकारचे खेळ सुद्धा घेण्यात येणार आहेत. सदर प्रदर्शनाच्या अनुषंगाने वृक्षारोपण करणे, पर्यावरण स्वच्छता, प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यांच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यावरण विभागाचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन