आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत सुधीरदास महाराज यांच्यासह महंतांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
नाशिक :- राज्याच्या मंत्री मंडळात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपदी ना.छगन भुजबळ यांची निवड झाल्याबद्दल आज नाशिक येथील कार्यालयात आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत सुधीरदास महाराज यांच्यासह महंतांनी ना.छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी आगामी कुंभमेळासह विविध विषयांवर चर्चा केली.
या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत पिठाधिश्वर अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष पंडित सतीश शुक्ल, धर्मसभा उपाध्यक्ष महापंडित मकरंद गर्ग, पंडित प्रफुल्ल गायधनी, पंकज मिश्रा, कैलास मुदलियार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment