डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे,कार्यक्रम

आंबेगण :- डांग सेवा मंडळ नाशिक व बेजाॅन देसाई फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक शिक्षण कार्यशाळा डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळ नाशिक अध्यक्षा हेमलता बिडकर होत्या.  योगी अरविंद व  माताजी (पुदुचेरी) यांच्या संकल्पनेतून निर्मित झालेल्या एकात्मिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक विकासावर भर न देता त्यांच्या शारीरिक, भावनिक, आंतरीक व आत्मिक विकास करून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर देते. आपल्या नेहमीच्या शालेय वातावरणात अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी वातावरण निर्मिती कशी करता येईल, शिक्षकाची व्यापक भूमिका मार्गदर्शक म्हणून कशी पार पाडता येईल या विषयाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.डांग सेवा मंडळ नाशिक संचलित आंबेगण, वारे, सुळे,धांद्रीपाडा, शिंदे, उंबरठाण,कुकुडणे या आश्रमशाळेतील ३० शिक्षक व मुख्याध्यापक यात सहभागी झाले होते.
कार्यशाळेच्या तिन दिवसांच्या समारोप वेळी गुरूपौर्णिमाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या अध्यक्ष,प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तीन दिवसीय कार्यशाळेत आलेले अनुभव बुवासर, श्रीमती गवांदे, मुख्याध्यापिका गांगुर्डे व मुख्याध्यापक नाठेसर सांगितले.या कार्यशाळेच्या उद्घाटन व समारोपाचे सुत्रसंचलन माध्य.शिक्षक बी.एन.गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन माध्यमिक मुख्याध्यापक  संदिप कुमावत यांनी केले. कार्यशाळेसाठी बेजॉन देसाई फाउंडेशनचे डॉ. अश्विन कुमार भारद्वाज , डॉ. स्मिता अमृते , विवेकसर , तृप्ती झंझाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचे हेमलताताई यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वीते साठी मुख्याध्यापिका छाया पाटील,अधिक्षक जोरी सर , कैलास कुवर , अधिक्षिका प्रियंका बागुल , वसंत डोंगरे , सतीश राऊत , भास्कर दळवी , कमलेश सातपुते , श्री केदारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला