मखमलाबाद विद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे उद्दघाटन मोठ्या उत्साहात संपन्न
मखमलाबाद ( प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे विज्ञान छंद मंडळाचे उद्दघाटन मोठ्या उत्साहात झाले.मराठा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपिठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,जेष्ठ शिक्षक नितीन भामरे,बाबाजी मुरकुटे,अनिल शेवाळे,संतोष उशीर,विज्ञान छंद मंडळाचे प्रमुख प्रविण कारे,योगीता कासार उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचाने अतिशय सुरेल असे विज्ञानगीत सादर केले.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुणे अरुण पिंगळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी विज्ञान छंद मंडळ स्थापन करण्यामागील हेतु व उद्देश समजावून सांगितला.विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे काय व मानवाने विज्ञानाचा वापर कल्पकता वाढविण्यासाठी कसा करता येऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन केले.विचारक्षमता,वैज्ञानिक दृष्टीकोन कल्पकता या सर्व गोष्टी मुलांमध्ये रुजाव्या यासाठी विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली असेही त्यांनी सांगितले.विज्ञान छंद मंडळ प्रमुख प्रविण कारे यांनी विज्ञान छंद मंडळाचा इतिहास व व्याख्या तसेच वार्षिक नियोजन यांची सखोल माहिती दिली.कु.अनुष्का गीते हिने माजी राष्ट्रपती शास्रज्ञ डाॅ.अब्दुल कलाम व शास्रज्ञ सी.व्ही.रमन यांच्या जीवनकार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.जेष्ठ विज्ञान शिक्षिका मोनाली बेंडकुळे यांनी टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तुंपासुन वैज्ञानिक प्रयोग,उदासिनीकरण अभिक्रीया,ध्वनी तरंग असे विविध विज्ञानाचे प्रयोग करुन दाखविले.प्रमुख पाहुणे अरुण पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात विज्ञान किती महत्वाचे आहेत याविषयी अगदी सोप्या भाषेत सखोल मार्गदर्शन केले.विज्ञानातील विविध तत्वे,संबोध समजावून घेऊन त्यांचे सामान्यीकरण करुन आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे उपयोगात येते हे उदाहरणासह स्पष्ट केले.सी.व्ही.रमन यांचे शोध व संशोधन,मेरी क्युरी,शास्रज्ञ डाॅ.अब्दुल कलाम या शास्रज्ञांच्या कार्यातून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागतो.विद्यार्थ्यांनी जिज्ञासु वृत्ती वाढवावी आणि विज्ञानातील संशोधक निर्माण व्हावे यासाठी विज्ञानाच्या विविध स्पर्धेत,उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा.भारतीय शास्रज्ञांच्या शोधांचा अभ्यास करावा.सकाळी उठल्यापासुन रात्री झोपेपर्यंत क्षणोक्षणी आपल्या जीवनात विज्ञानाचा सहभाग कसा असतो हे त्यांनी सांगितले.विज्ञानाचे फायदे व तोटे अनेक उदाहरणांसह त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी विचारलेल्या विविध वैज्ञानिक प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन योग्य उत्तरे दिलीत.स्मार्ट फोनमुळे सर्व जग आपल्या हातात आहे,इंटरनेटमुळे काही सेकंदात जगभरातील अनेक गोष्टींचा आपण अभ्यास करु शकतो.परंतु विद्यार्थ्यांनी या स्मार्टफोनचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी,अभ्यासासाठी करावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.
विज्ञान छंद मंडळ खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आले.
अध्यक्ष - कु.राजेंद्र शर्मा,उपाध्यक्ष - कु.सिध्दी पिंगळे
सचिव - कु.अथर्व झाल्टे,सहसचिव - कु.हर्षाली पवार,ग्रंथपाल - कु.आकांक्षा कोलते,कोषाध्यक्ष - कु.प्रथमेश मुंढे,बातमीदार - कु.गायत्री जेजुरकर,सदस्य - कु.ज्ञानराज पवार,सदस्य - कु.रोहीत गुठले,सदस्य - कु.देवयानी भोये,सदस्य- कु.सोहम पवार,सदस्य - कु.दिव्या जगताप,सदस्य - कु.श्लोक हुमन,सदस्य कु.प्रांजल भामरे,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विज्ञान शिक्षिका योगीता कासार यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ विज्ञान शिक्षक अनिल शेवाळे यांनी केले.कार्यक्रमास जेष्ठ विज्ञान शिक्षकवृंद वर्षा पाटील,मनिषा पाटील,रुपाली शिंदे,मोनाली बेंडकुळे,भाग्यश्री बागले,योगिता रोडे,कल्पना देशमाने,सुनिता घोटेकर,अनुपमा पवार,सोनल घडवजे,अभिजीत न्याहारकर,प्रयोगशाळा सहाय्यक संजय कानवडे,सुनिल मुळक,प्रकाश अहिरे व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment