मखमलाबाद विद्यालयातील कु.वैष्णवी पिंगळे हिचे एन.सी.सी.फायरींग कँपमध्ये सुयश
मखमलाबाद :- ( प्रतिनिधी समाधान शिरसाठ ) — मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथील आर्मी एन.सी.सी.ची विद्यार्थीनी कु.वैष्णवी पंडित पिंगळे हिने के.एस.के.डब्लु काॅलेज सिडको,नाशिक येथे १ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी.यांनी आयोजीत केलेल्या फायरींग कँपमध्ये सुयश संपादन केले.तिला मेडल व प्रमाणपत्र मिळाले असुन टी.सी.एस.कँपसाठी तिची निवड झाली आहे.या कँपमध्ये ३९३ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता.त्यातील १० विद्यार्थीनींची फायरींगमध्ये निवडझाली आहे.या यशस्वी विद्यार्थीनीस एन.सी.सी.आर्मी आॅफीसर भास्कर भोर व नेव्हल एन.सी.सी.आॅफीसर दयाराम मुठाळ यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
एन.सी.सी.आर्मी विद्यार्थीनी कु.वैष्णवी पिंगळे हिचे मविप्र संचालक रमेश पिंगळे,मविप्र शिक्षणाधिकारी डाॅ.अशोक पिंगळे,उच्च माध्यमिक स्कुल कमिटी अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे,अभिनव स्कुल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले,कला व वाणिज्य महाविद्यालय कमिटी अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन स्कुल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनकरराव पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,सर्व स्कुल कमिटी सदस्य,सभासद,ग्रामस्थ,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment