गौळाणे भागात बिबट्याचा मुक्त संचार, सीसीटीव्हीत कैद बंदोबस्त करण्याची मागणी परिसरात भितीचे वातावरण
नाशिक :- गौळाणे भागात बिबट्याचा मुक्त सचार वाढल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झालेे आहे. गौळाणे येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम पांडुरंग चुंभळे यांच्या बगल्यांच्या आवारात रात्री 2:30 वाजेच्या सुमारास बिबट्याचा शिरकाव झाल्याने चुंभळे कुटुंबियांसह मळे परिसरातील शेतकऱ्यांची घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलनाचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मध्यरात्री कुत्रे भुंकण्याच्या आवाज आल्यावर सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर बंगल्याच्या आवारात बिबट्या शिकारीच्या शोधात दिसला.घरातील सगळे भयभीत झाले.या बिबट्याचा कायमचा बदोबस्त केला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. .बिबट्या मुक्त संचार करत असल्याने यापूर्वी 20 ते 25 वेळेस चुंभळे यांच्या घराच्या आवारात बिबट्याचा वावर दिसून आला होता. त्यावेळी बिबट्याने पाळीव श्वानावर हल्ला केला होता.पुन्हा आता याच भागात बिबट्या आढळून आला.यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिजरा लावला आहे.पण तो पिजऱ्यात येत नाही. वन विभागास माहिती देण्यात आली असून बिबट्याचा माग घेण्यात आला आहे.नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले.बिबट्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
या भागात यापूर्वीही बिबट्या आढळून आला होता. वनविभागाने कायमस्वरूपी रात्रीची ग्रस्त वाढवावी नागरिकांमधील भीती दुर करावी अशी मागणी
लहानु चुंभळे यांनी केली आहे. ग्रामस्थांनी बिबटया येत असल्याने परिणामी त्यांच्या दहशतीने आमचे शेतमजुर येणे बंद झाले असून शेतीच्या कामाचे नुकसान होत आहे वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा अन्यथा परिसरातील शेतकरी आंदोलन करतील. असे शांताराम चुंभळे यावेळी म्हणाले.
Comments
Post a Comment