मखमलाबाद विद्यालयात पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे मविप्र संचालक रमेश पिंगळे व प्राचार्य संजय डेर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ८ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा पालक मेळावा वर्गवार घेण्यात आला.प्रत्येक वर्गात फलकलेखन, रांगोळी,पुष्परचना करुन सजावट करण्यात आली होती.पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.पालकांच्या शुभहस्ते सरस्वतीपुजन करुन विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.वर्गशिक्षकांनी प्रास्ताविकात पालक मेळावा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा प्रयत्नशील आहे.पालकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता अभ्यासाबरोबरच शालेय शिस्त,आरोग्य,हजेरी,गणवेश,केशरचना,दप्तर चेक करणे,विद्यार्थ्यांचे मित्र मैत्रिणी यांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.पालकांनी विद्यार्थ्यांशी रोज संवाद साधाला पाहीजे.पालकांनीही आपल्या मनोगतात शाळेची गुणवत्ता,शिस्त,विविध नाविन्यपूर्ण उपक्रम,भौतिक सुविधा यांबद्दल समाधान व्यक्त केले.मविप्र संचालक रमेश पिंगळे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड यांनी वर्गवार सदिच्छा भेटी देऊन पालकांशी संवाद साधला व सर्वांना शुभेच्छा दिल्या.या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केले.पालक मेळावा यशस्वितेसाठी प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,सर्व वर्गशिक्षक,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
Comments
Post a Comment