मखमलाबाद विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
मखमलाबाद :- ( प्रतिनिधी समाधान शिरसाठ ) — मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे महर्षी व्यास पौर्णिमा "गुरुपौर्णिमा" म्हणुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ल यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीतमंच यांनी "हे गुरुदेव प्रणाम आपके चरणोमे" हे गीत व "ब्रम्हानंदम परम सुखदम,केवलम ज्ञानमूर्ती" हा श्लोक सादर केला.कु.मयुरी बोरसे हीने गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.आषाढ शुध्द पौर्णिमेला "गुरुपौर्णिमा" साजरी केली जाते.या पौर्णिमेला "व्यासपौर्णिमा" असेही म्हणतात.कारण आदीगुरु महर्षी व्यासांचा जन्म या पावन दिवशी झाला होता.ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे "गुरुपौर्णिमा".भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात.गुरु हे तेजस्वी सुर्याप्रमाणे असतात.आपल्या जीवनातील अंधार ते आपल्या ज्ञानाद्बारे दुर करतात.प्राचार्य संजय डेर्ले यांनी आपल्या मनोगतात आई वडील हेच आपले पहीले गुरु आहेत,त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावी,त्यांची सेवा करावी.त्यानंतर आपले शिक्षक आपले गुरु असतात.विद्यार्थ्यांनी आपले आचरण चांगले ठेवावे.विद्यार्थी दशेतील आचरण व शिस्त ही आयुष्यभर उपयोगी पडते असेही त्यांनी शेवटी सांगितले.सुत्रसंचालन कु.श्रावणी खैरनार हिने केले.या सहभागी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका पल्लवी पगार व योगीता कापडणीस यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment