मखमलाबाद विद्यालयात शिक्षक सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे मविप्र संचालक रमेश पिंगळे व मविप्र शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्करराव ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.प्राचार्य संजय डेर्ले यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रास्ताविकात प्राचार्यांनी शाळेची भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेची सविस्तर माहिती दिली.मान्यवरांच्या शुभहस्ते स्काॅलरशीप मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.मविप्र शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्करराव ढोके यांनी या सहविचार सभेस बहुमोल असे मार्गदर्शन केले.मविप्र संस्थापातळीवर विविध भौतिक सुविधांचा पाठपुरावा करुन लवकरच कामास सुरुवात करणार आहोत.यामध्ये अभिनव इमारतीवरील सहा खोल्यांचे बांधकाम,विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वाढीव स्वच्छतागृह,शाळेमागील जागेत पार्कींग व्यवस्था,ग्रीन जीम अशा विविध सुविधांबरोबरच त्यांनी शैक्षणिक कार्याची माहिती दिली.मविप्र संस्थेतर्फे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था पातळीवर उच्च प्रतिच्या विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत.तसेच सर्व शिक्षकवृंदांसाठी विविध विषयांची प्रशिक्षणे आयोजीत करण्यात आलेली आहेत.शालेय स्तरावर सुध्दा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकवृंदांनी आपले अध्यापन दर्जेदार करावे असेही त्यांनी शेवटी सांगितले.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांनी शैक्षणिक,भौतिक सुविधांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.मखमलाबादच्या शाळेचे नाव उज्वल आहेतच.अजुन ते कसे उंचावेल याची जबाबदारी शाळेतील प्रत्येक घटकांची आहेत.शाळेतील विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या व उपाययोजनांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक संतोष उशीर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन भामरे यांनी केले.सहविचार सभेस पर्यवेक्षिका माधुरी थेटे,ज्युनियर काॅलेज प्रमुख उज्वला,देशमुख,प्राध्यापक,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment