मा.नगरसेविका प्रियंका ताई माने यांची प्रभाग क्रमांक ३ मधील रस्त्याच्या फेरफार संदर्भात विकासकाची थेट मनपा आयुक्तांकडे तक्रार
नाशिक :- प्रभाग क्र ३ सरस्वती नगर मधील सं.नं २५२ व २४२ मुंबई आग्रा हायवेला जोडणारा २८ वर्षापासून मंजूर असलेला १२ मीटर रुंदीचा सरस्वती मंदिर रोड सर्वे नंबर २५२/२ मधील रस्ता ९ मीटर चा दाखवून त्या मध्ये विकासकाने मनपाची दिशाभूल करून बांधकाम चालू केले त्या विरोधात मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांची माजी नगरसेविका प्रियंकाताई माने, धनंजय माने यांच्यासह परिसरातील असंख्य महिला भगिनी व जेष्ठ नागरिक यांनी भेट घेत निवेदन सादर केले विकासकाने जो रस्ता ९ मीटर चा दाखवून त्याला बांधकाम परवानगी दिली आहे ती बांधकाम परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली आहे.आयुक्तांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन याप्रसंगी दिले आहे. प्रभागातील असंख्य महिला भगिनी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment